एवलॉन टेक्नॉलॉजीजच्या (Avalon Technologies IPO) आयपीओनं गुंतवणूकदारांची निराशा केली. शेअर बाजारात कंपनीचं लिस्टिंग खराब झालं आहे. कंपनीचे शेअर्स बीएसईवर ४३१ रुपयांवर लिस्ट झाले. पण काही वेळातच कंपनीच्या शेअर्सनं ४२३.६५ रुपयांची पातळी गाठली. सकाळी १०.१५ वाजता, एवलॉन टेक्नॉलॉजीजचे शेअर्स ४२६ रुपयांवर ट्रेड करत होते, जे लिस्टिंग प्राईजपेक्षा १.१६ टक्क्यांनी कमी होते. प्री-ओपनिंग सत्रादरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती.
“कंपनीची मजबूत आणि स्थिर आर्थिक परिस्थिती असूनही, PAT मध्ये घसरण झाली आहे. हाय रिस्क घेणारे गुंतवणूकदार हा स्टॉक दीर्घ मुदतीसाठी ठेवू शकतात,” अशी प्रतिक्रिया स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे वरिष्ठ विश्लेषक प्रवेश गौर यांनी दिली.
एवलॉन टेक्नॉलॉजीजचा आयपीओ ३ एप्रिल २०२३ रोजी उघडला. हा IPO किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ६ एप्रिल २०२३ पर्यंत खुला होता. कंपनीनं आपल्या आयपीओसाठी ४१५ रुपये ते ४३६ रुपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केली होती. एव्हलॉन टेक्नॉलॉजीच्या आयपीओची लॉट साइज ३४ शेअर्स होती. कंपनीच्या एका शेअरची फेस व्हॅल्यू केवळ २ रुपये होती.
सबस्क्रिप्शन डिटेल्ससबस्क्रिप्शनच्या अखेरच्या दिवशी हा आयपीओ २.३४ पट सबस्क्राइब झाला. एवलॉन टेक्नॉलॉजीजचा आयपीओ रिटेल कॅटेगरीत ०.८८ पट, क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स कॅटेगरीत ३.७७ पट आणि नॉन इन्स्टिट्युशनल बायर्स कॅटेगरीत ०.४३ पट सबस्क्राईब झाला होता.