Join us

ठोक महागाई सलग दहाव्या महिन्यात उणे

By admin | Published: September 15, 2015 3:53 AM

चलनवाढ कमी होण्याचा कल सलग दहाव्या महिन्यातही कायम राहिला आणि आॅगस्टमध्ये ती इंधन आणि भाजीपाल्यावर उणे ४.९५ टक्क्यांवर आली. या पार्श्वभूमीवर व्याजदरात

नवी दिल्ली : चलनवाढ कमी होण्याचा कल सलग दहाव्या महिन्यातही कायम राहिला आणि आॅगस्टमध्ये ती इंधन आणि भाजीपाल्यावर उणे ४.९५ टक्क्यांवर आली. या पार्श्वभूमीवर व्याजदरात कपात करण्याचे दडपण रिझर्व्ह बँकेवर वाढले आहे.घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित ही चलनवाढ जुलैमध्ये उणे ४.०५ टक्के होती. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपासून तिचा कल हा उणे राहिला आहे. आॅगस्ट २०१४ मध्ये चलनवाढ ३.८५ टक्के होती. तथापि, कांदे आणि डाळींचे भाव भडकले असून त्यांची चलनवाढ ही गेल्या आॅगस्टमध्ये अनुक्रमे ६५.२९ आणि ३६.४० टक्के होती, असे सोमवारी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.एकूण विचार केला तर खाद्यान्नांच्या किमतीत सलग दुसऱ्या महिन्यात चलनवाढ ही उणे १.१३ टक्के होती. भाजीपाल्यांचे भाव २१.२१ टक्क्यांनी, तर बटाट्याचे भाव ५१.७१ टक्क्यांनी खाली आले.आॅगस्टमध्ये इंधन आणि वीज विभागात चलनवाढ ही उणे १६.५० टक्के होती, तर उत्पादित वस्तूंसाठी ती उणे १.९२ टक्के होती. आॅगस्टमध्ये महाग झालेला कांदा आणि डाळींशिवाय अंडी, मासे व मांस ३.३० टक्के, दूध २.०८ आणि गहू २.०५ टक्क्यांनी महागले होते. जूनमध्ये चलनवाढ ही उणे २.४० टक्के असेल असा अंदाज होता. तो सुधारून उणे २.१३ टक्के करण्यात आला.व्याजदर कपातीसाठी दडपण- रिझर्व्ह बँक आपली धोरणे आखण्यासाठी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा विचार करते. बँकेचे व्याज धोरण येत्या २९ सप्टेंबर रोजी जाहीर होईल. धोरणात्मक व्याजदरात कपात करण्यासाठी आता बँकेवर दबाव राहील, असे दिसते.-जुलैमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक ३.७८ टक्के एवढा कमी नोंद झाला. चलनवाढ येत्या महिन्यात नेमकी कशी असेल हे बँकेला आणखी स्पष्टपणे हवे आहे. बँकेने ४ आॅगस्ट रोजी धोरणाचा आढावा घेतला तेव्हा त्यात महत्त्वाच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता.