Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel ची जबरदस्त ऑफर! केवळ १५०० रुपयांत तुमचा नॉर्मल टीव्ही होईल 'स्मार्ट’

Airtel ची जबरदस्त ऑफर! केवळ १५०० रुपयांत तुमचा नॉर्मल टीव्ही होईल 'स्मार्ट’

पाहा नक्की कसा करू शकता तुमचा टीव्ही स्मार्ट.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 02:48 PM2023-01-01T14:48:30+5:302023-01-01T14:49:08+5:30

पाहा नक्की कसा करू शकता तुमचा टीव्ही स्मार्ट.

Awesome offer from Airtel Your normal TV will become Smart for just Rs 1500 know package details | Airtel ची जबरदस्त ऑफर! केवळ १५०० रुपयांत तुमचा नॉर्मल टीव्ही होईल 'स्मार्ट’

Airtel ची जबरदस्त ऑफर! केवळ १५०० रुपयांत तुमचा नॉर्मल टीव्ही होईल 'स्मार्ट’

सध्या स्मार्टचा काळ आहे. घड्याळं काय, घरं, टीव्ही, स्मार्टफोन सगळंच स्मार्ट होत चाललंय. अनेकांकडे आजही नॉर्मल टीव्ही असल्याचं आपण पाहतो. परंतु तुम्ही तो अपग्रेड करू शकता. यासाठी तुम्हाला अधिक पैसे खर्च करण्याची गरजही नाही. एअरटेल तुम्हाला केवळ १५०० रुपयांत टीव्ही स्मार्ट करण्याची ऑफर देत आहे.

ही खूप चांगली ऑफर आहे कारण स्मार्ट टीव्ही ही आजच्या काळाची गरज आहे. सध्या ओटीटी कंटेन्टचा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत एअरटेल डिजिटल टीव्हीच्या एक्सस्ट्रीम बॉक्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या जुन्या सामान्य टीव्हीला लगेच स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकता. Xstream Box च्या मदतीने तुम्ही OTT कंटेंट थेट तुमच्या जुन्या टीव्हीवर पाहू शकता.

1500 रुपयांत बॉक्स
Airtel Xstream Box सध्या फक्त 1500 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. त्याची मूळ किंमत 2650 रुपये आहे. सध्या कंपनी ही ऑफर देत आहे. तुम्ही ते इतर एअरटेल सेवांसह देखील बंडल करू शकता. एअरटेल ब्लॅकमध्ये येणाऱ्या सेवेसह हे बंडल केले जाऊ शकते. Airtel Xstream Box हा एक सेट-टॉप बॉक्स आहे, ज्याच्या मदतीनं तुम्हाला SonyLIV, Amazon Prime, Eros Now, Disney + Hotstar सारख्या अनेक ओटीटी ॲप्सचा आनंद घेता येऊ शकतो.

Xstream Box च्या टॉप फीचर्सबद्दल बोलायचे तर, यात 5000 हून अधिक ॲप्स, बिल्टइन क्रोमकास्ट, 500 हून अधिक टीव्ही चॅनेल, गुगल असिस्टंट वरून सर्च आणि Android TV 9 देण्यात आलेले आहे. यामध्ये तुम्ही 4K कंटेटही पाहू शकता.

Web Title: Awesome offer from Airtel Your normal TV will become Smart for just Rs 1500 know package details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Airtelएअरटेल