सध्या सर्वच कंपन्यांमध्ये आपले ग्राहक टिकवण्यासाठी आणि नव्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनव्या ऑफर्स आणल्या जात आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. सध्या अनेक ग्राहक बीएसएनएलचं सिम वापरत आहेत. तुम्हीही कमी किमतीत दीर्घ वैधता देणारा प्लॅन शोधत असाल तर बीएसएनएलकडे अनेक पर्याय आहेत. BSNL च्या अशाच काही प्रीपेड प्लॅन्सवर एक नजर टाकूया, जे कमी किंमतीत दीर्घ वैधतेचा पर्याय देतात.
२४ रूपयांचा प्लॅन
कंपनी २४ रूपयांचे एक स्पेशल टेरिफ व्हाऊचर ऑफर करत आहे. या व्हाऊचरचे वैशिष्ट्य म्हणजे याची वैधता ३० दिवसांची आहे. प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. यामध्ये लोकल आणि एसटीडी कॉलिंगसाठी २० पैसे प्रति मिनिट शुल्क आकारले जाते. कंपनीकडे आणखी असेच काही प्लॅन्स आहेत.
४९ रूपयांचा प्लॅन
कंपनीच्या या प्लॅनमध्ये थोडी कमी वैधता उपलब्ध आहे. असे असले तरी या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि डेटा सुविधा अधिक आहेत. प्लॅनमध्ये २० दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यामध्ये १०० व्हॉईस कॉलिंग मिनिटे (लोकल + एसटीडी) आणि १ जीबी डेटा दिला जातो.
२९ रूपयांचा प्लॅन
जर तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा प्लॅन योग्य ठरू शकतो. या प्लॅनमध्ये ५ दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यासोबत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि १ जीबी डेटा मिळतो.