रिलायन्स जिओनं एक उत्तम सेवा सादर केली आहे, ज्यामध्ये लॅपटॉप, फोन आणि डेटासाठी एअरफायबर सेवा स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जात आहे. हा एक रेंटल प्लॅन आहे, ज्यामध्ये कोणताही लॅपटॉप, फोन आणि Jio AirFiber सारखी इतर सेवा खरेदी करण्याऐवजी भाड्यानं घेतली जाऊ शकतात. ही जिओची फायनान्शिअल सर्व्हिस असून विशेषतः कॉर्पोरेट्ससाठी आहे. याचा अर्थ ही सेवा सामान्य युझर्ससाठी नाही.
काय आहे Daas सर्व्हिस?
ही सेवा DaaS म्हणून ओळखली जाते. ज्यामध्ये डिव्हाइस ठराविक कालावधीसाठी भाड्यानं दिलं जातं, जे दर महिन्याला किंवा एका ठराविक हप्त्यात भाड्यानं दिले जाऊ शकतं. मोठ्या कंपन्यांना एकाच वेळी हजारो लॅपटॉप आणि मोबाइल फोन खरेदी करावे लागतात, ज्यामध्ये खूप पैसा खर्च होतो, तर नफा मिळविण्यासाठी अनेक वर्षे लागतात, ज्यामुळे कंपन्यांवर खूप आर्थिक भार पडतो. अशा समस्यांचा सामना करण्यासाठी जिओनं लॅपटॉप, फोन आणि इतर डिव्हाईसेस रेंटनं देण्याची योजना आणली आहे. ही योजना कोणत्याही स्टार्टअप किंवा छोट्या कंपनीसाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
काय आहे जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस?
मुकेश अंबानींच्या समूह रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नवीन जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनं DaaS चे फायदे स्पष्ट केले आहेत, त्यानुसार DaaS फायनान्शिअल सर्व्हिस कमी जोखमीच्या आहेत. मुकेश अंबानी यांच्या मते Jio Financial Services (JFS) चं उद्दिष्ट देशातील प्रत्येक क्षेत्रासाठी आर्थिक सेवा प्रदान करणं आहे.