Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर; जाणून घ्या, कुठे किती जणांवर कुऱ्हाड?

आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर; जाणून घ्या, कुठे किती जणांवर कुऱ्हाड?

काही दिवसांत आणखी काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा जाणकारांनी दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 06:18 AM2022-11-23T06:18:47+5:302022-11-23T06:21:20+5:30

काही दिवसांत आणखी काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा जाणकारांनी दिला आहे.

axe over employee jobs in IT companies | आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर; जाणून घ्या, कुठे किती जणांवर कुऱ्हाड?

आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर; जाणून घ्या, कुठे किती जणांवर कुऱ्हाड?

नवी दिल्ली : जगभरातील तंत्रज्ञान कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. गुगलची पालक कंपनी अल्फाबेट आपल्या ६ टक्के म्हणजेच १० हजार कर्मचाऱ्यांना काढणार आहे. चांगले काम न करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला जाणार आहे. काढण्यापूर्वी कंपनी कर्मचाऱ्यांना ६० दिवसांचा अवधी देणार आहे. अल्फाबेट मध्ये एकूण १.८७ लाख कर्मचारी आहेत. काही दिवसांत आणखी काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा जाणकारांनी दिला आहे.

कुठे किती जणांवर कुऱ्हाड? -

मेटा : सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांना काढणार 
ॲमेझॉन : १० हजार कर्मचाऱ्यांना काढणार
सी-गेट : ३ हजार कर्मचारी काढणार
लिफ्ट :  ७०० कर्मचाऱ्यांना काढले
स्ट्राइप : १,१२० लोकांना काढणार
ओपनडोर : ५५० कर्मचारी काढणार
नेटफ्लिक्स : ५०० कर्मचाऱ्यांना काढले
एलअँडटी : ५ टक्के कर्मचारी कमी केले
टेक महिंद्रा : १.४ टक्के कर्मचारी कपात
विप्रो : ६.५ टक्के कर्मचारी कमी केले
स्नॅपचॅट : १ हजार जणांच्या नोकऱ्या जाणार
शॉपिफाय : १ हजार जणांना काढण्याची घोषणा
मायक्रोसॉफ्ट : जुलैपासून १% कर्मचारी कमी
इंटेल : २० टक्के कर्मचारी काढणार
ट्विटर : ३,७०० कर्मचाऱ्यांना काढले, आता भारतात इंजिनीअर्स भरणार
 

Web Title: axe over employee jobs in IT companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.