Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' कार्डद्वारे खरेदी केल्यास मिळेल 5 टक्के कॅशबॅक; जाणून घ्या, काय आहेत फीचर्स?

'या' कार्डद्वारे खरेदी केल्यास मिळेल 5 टक्के कॅशबॅक; जाणून घ्या, काय आहेत फीचर्स?

axis bank freecharge credit card 5 percent cashback fees features : ई-वॉलेट कंपनी फ्रीचार्जद्वारे (Freecharge) युजर्स मोबाइल रिचार्ज, बिल पेमेंट, बस बुकिंग, सोन्याची खरेदी इत्यादी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 12:24 PM2021-03-19T12:24:26+5:302021-03-19T12:25:58+5:30

axis bank freecharge credit card 5 percent cashback fees features : ई-वॉलेट कंपनी फ्रीचार्जद्वारे (Freecharge) युजर्स मोबाइल रिचार्ज, बिल पेमेंट, बस बुकिंग, सोन्याची खरेदी इत्यादी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात.

axis bank freecharge credit card 5 percent cashback fees features | 'या' कार्डद्वारे खरेदी केल्यास मिळेल 5 टक्के कॅशबॅक; जाणून घ्या, काय आहेत फीचर्स?

'या' कार्डद्वारे खरेदी केल्यास मिळेल 5 टक्के कॅशबॅक; जाणून घ्या, काय आहेत फीचर्स?

Highlightsबरेच युजर्स या अ‍ॅपवर पेमेंट करताना कॅशबॅकचा (Cashback) पर्याय शोधत आहेत.

मुंबई : देशातील प्रमुख  ई-वॉलेट कंपनी फ्रीचार्जद्वारे (Freecharge) युजर्स मोबाइल रिचार्ज, बिल पेमेंट, बस बुकिंग, सोन्याची खरेदी इत्यादी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. त्याचबरोबर, बरेच युजर्स या अ‍ॅपवर पेमेंट करताना कॅशबॅकचा (Cashback) पर्याय शोधत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा क्रेडिट कार्डबद्दल (Credit Card) सांगणार आहोत, ज्याद्वारे फ्रीचार्ज अ‍ॅपवर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. (axis bank freecharge credit card 5 percent cashback fees features)

अ‍ॅक्सिस बँक फ्रीचार्ज क्रेडिट कार्डद्वारे (Axis Bank Freecharge Credit Card) फ्रीचार्ज अ‍ॅप किंवा वेबसाइटवर कोणत्याही व्यवहाराद्वारे 5 टक्के कॅशबॅक मिळत आहे. हे कॅशबॅक फ्रीचार्जवर सुरू असलेल्या ऑफर व्यतिरिक्त मिळत आहे. कॅशबॅकवर मात्र 500 रुपये कॅपिंग आहे. म्हणजे आपल्याला फक्त बिलिंग सायकलमध्ये 500 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळू शकते. बँकेच्या म्हणण्यानुसार, अ‍ॅक्सिस बँक फ्रीचार्ज क्रेडिट कार्डच्या ग्राहकाला दर वर्षी एकूण 6 हजार रुपये कॅशबॅक मिळेल.

(SBI ची खास सुविधा! आता कागदपत्रांशिवाय घर बसल्या उघडा खातं, जाणून घ्या प्रोसेस... )

Axis Bank Freecharge Credit Card चे फीचर्स

1) फ्रीचार्ज अ‍ॅपवर कोणत्याही कॅटेगरीत (मोबाइल रिचार्ज, बिल पेमेंट, बस बुकिंग, डीटीएच रिचार्ज इ.) 5% कॅशबॅक मिळेल.

2) Ola, Uber, Shuttle वर 2 टक्के कॅशबॅक.

3) इतर सर्व व्यवहारावर 1% कॅशबॅक.

4) कोणत्याही वॉलेट लोडवर कोणतीही कॅशबॅक उपलब्ध होणार नाही.

5) या क्रेडिट कार्डची जॉइनिंग फी 250 रुपये आहे.

6) या क्रेडिट कार्डाची वार्षिक फी 250 रुपये आहे.

7) सध्याच्या बिलिंग सायकलमध्ये कमावलेला कॅशबॅक पुढील बिलिंगच्या तारखेच्या 3 दिवस आधी क्रेडिट कार्ड खात्यावर जमा केला जातो.

(Business Ideas : कमी बजेटमध्ये घर बसल्या सुरू करा बिझनेस, तुमच्यासाठी काही सोप्या आयडियाज्)

Web Title: axis bank freecharge credit card 5 percent cashback fees features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.