नवी दिल्ली : या महिन्यात अनेक बड्या बँकांनी खासगी क्षेत्रातील फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) व्याजदर वाढवले आहेत. आता अॅक्सिस बँकेने (Axis Bank) सुद्धा आपल्या मुदत ठेवींच्या (Fixed Deposit) व्याजदरातही बदल केला आहे. जर तुम्हालाही हमीसह नफा मिळवायचा असेल तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट करू शकता.
अॅक्सिस बँकेने फिक्स्ड डिपॉझिटचे दर (FD Rates) फक्त एका मॅच्युरिटी कालावधीसह वाढवले आहेत. या अंतर्गत, जर कोणत्याही ग्राहकाने 1 वर्ष 11 दिवसांपासून ते 1 वर्ष 25 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी फिक्स्ड डिपॉझिट केले तर त्याला अधिक फायदा मिळेल. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन दर 21 मार्चपासून लागू झाले आहेत.
अॅक्सिस बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या वतीने, ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या बँकफिक्स्ड डिपॉझिटवर वाढीव व्याजाचा लाभ दिला जात आहे. या अंतर्गत ग्राहकांना 2.50 ते 5.75 टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे.
बँकेने व्याजदरात सुधारणा केल्यानंतर, 1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 5.30 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. तसेच, बँक फर्स्ट ग्राहकांना या कालावधीतील फिक्स्ड डिपॉझिटवर 5.25 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल. दरम्यान, बँकेने इतर कोणत्याही मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
कोणत्याही प्रकारच्या तपशीलवार माहितीसाठी, तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तुम्हालाही फिक्स्ड डिपॉझिट करायची असेल, तर अॅक्सिस बँकेच्या अधिकृत लिंकवर जाऊन तुम्ही बँकेच्या सर्व कार्यकाळातील नवीनतम व्याजदर तपासू शकता.
https://www.axisbank.com/docs/default-source/interest-rates-new/fixed-deposit-wef-21-03-2022.pdf