Lokmat Money > बिझनेस न्यूज > Axis Bankचा ग्राहकांना झटका! आता SMS सह 'या' सेवांसाठी द्यावं लागणार अधिक शुल्क

Axis Bankचा ग्राहकांना झटका! आता SMS सह 'या' सेवांसाठी द्यावं लागणार अधिक शुल्क

Axis Bank : खात्यात किमान रकमेची मर्यादाही वाढवण्याचा निर्णय़, रोख रक्कम काढल्यावर लागणारं शुल्कही वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 04:36 PM2021-04-02T16:36:51+5:302021-04-02T16:38:22+5:30

Axis Bank : खात्यात किमान रकमेची मर्यादाही वाढवण्याचा निर्णय़, रोख रक्कम काढल्यावर लागणारं शुल्कही वाढलं

axis bank revised sms cash withdrawal and other charges along with other services | Axis Bankचा ग्राहकांना झटका! आता SMS सह 'या' सेवांसाठी द्यावं लागणार अधिक शुल्क

Axis Bankचा ग्राहकांना झटका! आता SMS सह 'या' सेवांसाठी द्यावं लागणार अधिक शुल्क

Highlightsखात्यात किमान रकमेची मर्यादाही वाढवण्याचा निर्णय़रोख रक्कम काढल्यावर लागणारं शुल्कही वाढलं

खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेनेएसएमएस शुल्कामध्ये सुधारणा केली आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाद्वारे नवीन यंत्रणा लागू झाल्यानंतर अ‍ॅक्सिस बँकेने या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय बँकेनं रोख रक्कम काढण्यासाठी लागणारं शुल्कही वाढवलं आहेत. तर खात्यात किमान रक्कम ठेवण्याची मर्यादाही वाढवली आहे. परंतु दुसरीकडे अ‍ॅक्सिस बँकेनं अटेस्टेशन शुल्क कमी केल आहे.

जुलै २०२१ पासून ग्राहकांकडून प्रत्येक एसएमएससाठी २५ पैसे शुल्क आकारलं जाईल. तसंच कोणत्याही महिन्यात हे शुल्क २५ रूपयांपेक्षा जास्त असणार नाही. खासगी क्षेत्रातील सर्वाधिक मोबाईल बँकिंग ट्रान्झॅक्शन्स हे याच बँकेतून होतात. यामध्ये प्रमोशनल मेसेज किंवा ग्राहकांना मिळणाऱ्या ओटीपीवर शुल्क आकारलं जाणार नाही. प्रिमिअम खाती, पगाराची खाती आणि अन्य खात्यांसाठी हे शुल्क निरनिराळं असेल.

सध्या अ‍ॅक्सिस बँकेकडून एसएमएससाठी दरमहा ५ रूपये शुल्क आकारलं जातं. दर तीन महिन्यांनी ग्राहकांच्या बँक खात्यातून १५ रुपये वजा केले जातात. ३० जूनपर्यंत बँक ग्राहकांकडून १५ रूपयेच घेणार आहे. परंतु १ जुलै पासून प्रति एसएमएस २५ पैसे शुल्क आकारलं जाईल. पण कोणत्याही एका महिन्यात २५ रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारले जाणार नाही. तर बँकेतून रोख रक्कम काढल्यास बँक प्रति विड्रॉल ५ रूपये शुल्क आकारते. परंतु आता १ मे पासून बँक ग्राहकांकडून १००० रूपयांच्या विड्रॉलवर १० रूपये शुल्क आकारेल.

Read in English

Web Title: axis bank revised sms cash withdrawal and other charges along with other services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.