दिवाळीपूर्वी बँकांनी आता ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. अॅक्सिस बँक खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. आता बँकेने ग्राहकांना पुन्हा एक आनंदाची बातमी दिली आहे. जर तुमचे अॅक्सिस बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. अॅक्सिस बँकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. ही ०.७५ टक्क्यांनी करण्यात आली आहे.
अॅक्सिस बँकेने त्यांच्या एफडी दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.बँक आता १४ ऑक्टोबर २०२२ पासून वाढीव व्याजदर लागू करणार आहे.
बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीच्या एफडी वर जास्त व्याज देत आहे. बँकेच्या या निर्णयाचा ग्राहकांना खूप फायदा होणार आहे, कारण अॅक्सिस ही देशातील एक मोठी खासगी बँक आहे.
असे आहे नवे व्याजदर
ग्राहकांना ७ दिवस ते ६० दिवसांच्या एफडीवर ३.५० टक्के व्याज मिळेल.
६१ दिवस ते ६ महिन्यांच्या एफडीवर ४.२५ टक्के व्याज मिळेल.
६ महिने ते १ वर्ष या कालावधीसाठी, सामान्य ग्राहकांना ५.०० टक्के व्याज मिळेल.
१ वर्ष ते १५ महिन्यांच्या एफडीवर ६.१० टक्के व्याज मिळेल.