Join us  

श्रीराम जन्मभुमी अयोध्येवर जगाची नजर, 5 कोटी भाविक येणार; रु. 85000 मध्ये होणार मेकओव्हर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 2:49 PM

आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. पाचशे वर्षांचा वनवास भोगल्यानंतर भगवान श्रीराम भव्य मंदिरात विराजमान झाले.

Ayodhya Ram Mandir : आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. पाचशे वर्षांचा वनवास भोगल्यानंतर अयोध्यापती भगवान श्रीराम भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले. या कार्यक्रमाची फक्त देशातच नाही, तर जगभरात चर्चा होत आहे. एकीकडे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे देशात आनंदाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे 85,000 कोटी रुपयांतून राम जन्मभूमी अयोध्येचा मेकओव्हर होणार आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेफरीजने (Jefferies) राम मंदिराबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला, यामधून ही माहिती देण्यात आली आहे.

5 कोटी पर्यटक येणारजेफरीजने आपल्या अहवालात राममंदिराच्या अर्थकारणाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. राम मंदिरामुले अयोध्येत दरवर्षी 5 कोटींहून अधिक पर्यटक येतील. राममंदिरामुळे अयोध्येचा लक्षणीयरित्या विकास होईल. अनेक विमान कंपन्यांनी अयोध्येला त्यांची उड्डाणे सुरू केली आहेत, टाटाच्या इंडियन हॉटेल्स लिमिटेडसह अनेक कंपन्यांनी अयोध्येत त्यांचे प्रकल्प सुरू केले आहेत. या 85,000 कोटी रुपयांच्या मेकओव्हरमध्ये नवीन विमानतळ, नूतनीकरण केलेले रेल्वे स्टेशन, टाउनशिप, उत्तम रस्ते कनेक्टिव्हिटी यांचा समावेश आहे. 

सुमारे 70 एकरांवर पसरलेले मुख्य तीर्थक्षेत्र एका वेळी सुमारे 10 लाख भाविकांना होस्ट करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. येथे दररोज येणा-या यात्रेकरुंची संख्या 1-1.5 लाखांपर्यंत असण्याची अपेक्षा आहे. भारताच्या पर्यटन क्षेत्रात धार्मिक पर्यटनाचा वाटा सर्वात मोठा असल्याचे अहवालात म्हटले आहे. देशातील अनेक लोकप्रिय धार्मिक स्थळे पायाभूत सुविधांच्या अडचणी असूनही सुमारे 3 कोटी पर्यटकांना आकर्षित करतात आणि आता अयोध्येचे नवीन धार्मिक पर्यटन केंद्र उत्तम कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांसह बांधले गेले आहे, ज्यामुळे या भागाचा विकास अतिशय वेगाने होईल. 

टॅग्स :राम मंदिरअयोध्याव्यवसायपर्यटनगुंतवणूक