Ayodhya Hotel Booking: अयोध्येतील सर्व हॉटेल्स केवळ २२ जानेवारीसाठीच नव्हे तर संपूर्ण महिन्यासाठी १०० टक्के बुक झाली आहेत. काही विशेष हॉटेल्सनं आधीच १०० टक्के बुकिंग झाल्याचं म्हटलंय. लखनौ, प्रयागराज आणि गोरखपूरमध्ये अयोध्याराम मंदिराच्या १७० किमी परिघात असलेल्या हॉटेल्सची मागणी झपाट्यानं वाढली आहे. सिग्नेट हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक म्हणाले की त्यांच्या सर्व रुम्स या महिन्यासाठी बुक केल्या गेल्या आहेत. हॉटेलमधील खोलीचे सरासरी दर ८५,००० रुपयांच्या पुढे गेले आहेत.
हॉटेल्सनं वाढवले दर
व्हिआयपी लोकांना त्या ठिकाणी राहता यावं म्हणून सिग्नेट कलेक्शन केकेनं अयोध्येतील सर्व हॉटेल्सच्या ४५ टक्के रुम्स मंदिर ट्रस्टसाठी बुक केल्या आहेत. रॅडिसनने गेल्या बुधवारी अयोध्येत पार्क इन सुरू करण्यात आलं आणि ते २१ जानेवारीपर्यंत पूर्णपणे बुकही झालं आहे. "हा खूप व्यस्त काळ आहे. केवळ अयोध्येतीलच नाही तर लखनौमधील सर्व हॉटेल्स पूर्णपणे बुक केली जातील अशी त्यांची अपेक्षा आहे," असं मत सरोवर हॉटेल आणि रिसॉर्टच्या व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केलं.
किती आहे भाडं?
सिग्नेट कलेक्शन केके हॉटेलमधील सर्व रुम्स या महिन्यासाठी आगाऊ बुक करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रत्येक रुम सुमारे ८५,००० रुपये आणि त्याहूनही महागड्या किमतीत बुक करण्यात आली आहे. रेडिसन्स पार्क इन हॉटेल लाँच झाल्यानंतर लगेचच बुकिंगचा महापूर आला. हॉटेलमधील सर्व रुम्स २१-२२ जानेवारीसाठी बुक झाल्या आहेत. मात्र या रुम्स्सच्या भाड्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, ताज महाल लखनौच्या रुम्स ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत रिकाम्या होत्या पण या खोल्याही पूर्ण बुक झाल्याचा अंदाज आहे. येथील एका रुमची सरासरी किंमत २१,७७९ रुपयांवर पोहोचली होती. ओयो होमस्टेने लोकांसाठी जलद बुकिंग करून १००० रुम्स पूर्णपणे बुक केल्या आहेत. रेनेसान्स लखनौच्या बुकिंग डॉट कॉमवर दिलेल्या माहितीनुसार, एका खोलीचं भाडं ४२,२४४ रुपये आहे. रुम्स सध्या २२ जानेवारीसाठी उपलब्ध आहेत. लेमन ट्री लखनौ येथे एका रुमसाठी, २४,६८७ रुपये द्यावे लागतील.