मुंबई : आयुर्वेद ही देशाची प्राचीन परंपरा आहे. अनेक वैद्यांनी ही परंपरा जोपासली आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय आयुष मंत्रालयाने धनत्रयोदशी हा राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्याचे केंद्र व महाराष्ट्र सरकारने ठरविले असून, त्यासाठी आर्थिक तरतूदही केली जात आहे, असे प्रतिपादन राज्याच्या आयुर्वेद विभागाचे संचालक डॉ. कुलदीपराज कोहली यांनी येथे केले.
लोक आता आयुर्वेदाकडे वळू लागले आहेत. त्यांना आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात आले आहे. पण केंद्र सरकारने त्यासाठी वेगळे मंत्रालयच स्थापन केले आहे. आयुर्वेदाची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. ती वाढत असताना त्याचा कोणी गैरफायदा घेणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी, असे मत यावेळी व्यक्त झाले.
साण्डू ब्रदर्सतर्फे धन्वंतरी जयंतीनिमित्त चेंबूर येथे झालेल्या वैद्य सत्कार समारंभात ते बोलत होते. या निमित्ताने आयुर्वेदाच्या क्षेत्रात मोठे योगदान देणारे अशोक कुलकर्णी, श्रीविराज वर्मा, विनेश नागरे, नानासाहेब मेमाणे, हेमाली कर्पे आणि राहुल सोनावणे या सहा ज्येष्ठ वैद्यांचा कोहली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी मंत्राने प्रेरित होऊ न १० मे १८९९ रोजी साण्डू ब्रदर्सनी आयुर्वेदिक औषधांच्या निर्मिती सुरू केली. त्याला आता ११८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबईत ठाकुरद्वार येथे सुरू झालेली फॅक्टरी नंतर चेंबूर येथे हलविण्यात आली असे शशांक साण्डू यांनी सांगितले. या समारंभाला घन:श्याम सांडू तसेच आयुर्वेद क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
आयुर्वेदाची बाजारपेठ वेगाने वाढत आहे, डॉ. कोहली
आयुर्वेद ही देशाची प्राचीन परंपरा आहे. अनेक वैद्यांनी ही परंपरा जोपासली आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय आयुष मंत्रालयाने धनत्रयोदशी हा राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:41 AM2017-10-19T00:41:41+5:302017-10-19T00:42:15+5:30