Join us

मोदी सरकारच्या 'या' योजनेद्वारे तुम्ही दरमहा 15 हजारांची कमाई करू शकता!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 12:31 PM

Ayushman Bharat Yojana Latest Update : या योजनेंतर्गत सरकारी आणि खाजगी रुग्णालयात एक लाखाहून अधिक आयुष्मान मित्र तैनात करण्यात आले आहेत

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'आयुष्मान भारत योजने'चे देशातच नव्हे तर जगभरातून कौतुक होत आहे. या योजनेमुळे गरिबांना चांगले उपचार मिळण्यास मदत होत आहे. आरोग्य योजना असण्याबरोबरच त्यातून लोकांना रोजगारही मिळत आहे. केंद्रातील मोदी सरकारने आयुष्मान योजनेंतर्गत पाच वर्षांत 10 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

या योजनेंतर्गत सरकारी आणि खाजगी रुग्णालयात एक लाखाहून अधिक आयुष्मान मित्र तैनात करण्यात आले आहेत. आयुष्मान मित्रांना पगारासह इतर सुविधा दिल्या जातात. जर तुम्हालाही सरकारच्या या योजनेत सामील व्हायचे असेल तर तुम्ही आयुष्मान मित्र बनून दरमहा 15 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळवू शकता. दरम्यान, आयुष्मान मित्रच्या भरतीसाठी आरोग्य मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालय संयुक्तपणे काम करत आहे.

आयुष्मान मित्रचे कामआयुष्मान मित्रचे मुख्य काम या योजनेशी संबंधित प्रत्येक फायदा लाभार्थीला द्यावा लागतो. सरकारच्या योजनेशी संबंधित रुग्णालयांमध्ये त्यांची नियुक्ती केली जाते. एखाद्यासाठी अर्ज करून त्याचे आयुष्मान कार्ड बनवण्याची जबाबदारी आयुष्मान मित्रची आहे. त्यांची निवड 12 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्टच्या आधारे केली जाते. 12 महिने पूर्ण झाल्यावर ते पुन्हा वाढवले ​​जाऊ शकते.

पगार आणि इंसेंटिव्हदर महिन्याला 15 हजार रुपये आयुष्मान मित्रला दिले जातात. याशिवाय, प्रत्येक रुग्णावर 50 रुपयांचे इंसेंटिव्हही मिळतो. आयुष्मान मित्रची प्रत्येक जिल्ह्यात नियुक्ती आहे. त्यांच्या नियुक्तीची जबाबदारी जिल्हास्तरीय एजन्सीद्वारे केली जाते. निवड झाल्यानंतर, प्रशिक्षणाची जबाबदारी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयावर आहे.

आयुष्मान मित्र बनण्याची पात्रताअर्जदार 12 वी पास असावा. तसेच, संगणक आणि इंटरनेटचेही ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्जदाराने आयुष्मान मित्र प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि त्याला स्थानिक भाषेचे ज्ञान असावे. अर्जदाराचे वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याच्या नियुक्तीमध्ये महिला उमेदवारांना प्राधान्य दिले जाते.

टॅग्स :आयुष्मान भारतपैसा