Join us

IPO नं महिन्याभरात पैसा केला दुप्पट, शेअर्समध्ये अपर सर्किट; सचिन तेंडुलकरकडेही आहे स्टॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 2:42 PM

या कंपनीच्या शेअर्सना सलद दुसऱ्या दिवशी अपर सर्किट लागलं. बीएसईमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत 1333.30 रुपयांच्या पातळीवर पोहोचली.

Multibagger Stocks: शेअर बाजारात आझाद इंजिनिअरिंगच्या (Azad Engineering IPO) शेअर्समध्ये सलग दुसऱ्यांदा 5 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. त्यानंतर बीएसईमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत 1333.30 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. याआधी शुक्रवारीही कंपनीच्या शेअर्सना 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं होतं. कंपनीचा आयपीओ डिसेंबर 2023 मध्ये आला होता. सचिन तेंडुलकरचीही कंपनीत गुंतवणूक आहे. 

महिन्याभरात पैसे झाले दुप्पट 

आझाद इंजिनिअरिंगचा आयपीओ आला होता तेव्हा कंपनीनं त्याचा प्राईज बँड 499 ते 524 पर्यंत निश्चित केला होता. कंपनीनं 28 शेअर्सचा एक लॉट तयार केला होता.. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान 14,672 रुपयांची गुंतवणूक करावी लागली. ज्या गुंतवणूकदारांना कंपनीनं IPO दरम्यान शेअर्सचे वाटप केले होते, त्यांचे पैसे आतापर्यंत दुप्पट झाले आहेत. आझाद इंजिनिअरिंगचे शेअर्स बीएसईवर २८ डिसेंबर रोजी ७२० रुपयांवर लिस्ट झाले होते.

सचिन तेंडुलकरचीही गुंतवणूक 

कंपनीच्या शेअर होल्डिंगनुसार माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरकडे कंपनीचे 4.3 लाख शेअर्स होते. त्यानं मार्च 2022 मध्ये 114.10 रुपये प्रति शेअर या दरानं हे शेअर्स खरेदी केले. याशिवाय सायना नेहवाल, पीव्ही सिंधू आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही या कंपनीत गुंतवणूक केली आहे. या तिन्ही खेळाडूंचे प्रत्येकी 44 हजार शेअर्स होते. यापैकी एकाही स्टारनं आयपीओ दरम्यान शेअर्स विकले नव्हते.  

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजारसचिन तेंडुलकर