Lokmat Money > बिझनेस न्यूज > एक ऑर्डर अन् शेअरमध्ये तुफान तेजी, खरेदीसाठी लोकांची झुंबड; माजी दिग्गज क्रिकेटरनंही केलीय मोठी गुंतवणूक!

एक ऑर्डर अन् शेअरमध्ये तुफान तेजी, खरेदीसाठी लोकांची झुंबड; माजी दिग्गज क्रिकेटरनंही केलीय मोठी गुंतवणूक!

माजी क्रिकेटर सचिन रमेश तेंदुलकरनेही आझाद इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, सचिनने मार्च 2023 मध्ये या शेअरमध्ये 5 कोटी रुपयांची गुंतवणूक करत जवळपास 4 लाख इक्विटी शेअर घेतले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 07:40 PM2024-07-12T19:40:34+5:302024-07-12T19:43:10+5:30

माजी क्रिकेटर सचिन रमेश तेंदुलकरनेही आझाद इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, सचिनने मार्च 2023 मध्ये या शेअरमध्ये 5 कोटी रुपयांची गुंतवणूक करत जवळपास 4 लाख इक्विटी शेअर घेतले आहेत.

azad engineering share surges 5 percent big order received from abroad; Sachin Tendulkar also has 4 lakh shares | एक ऑर्डर अन् शेअरमध्ये तुफान तेजी, खरेदीसाठी लोकांची झुंबड; माजी दिग्गज क्रिकेटरनंही केलीय मोठी गुंतवणूक!

एक ऑर्डर अन् शेअरमध्ये तुफान तेजी, खरेदीसाठी लोकांची झुंबड; माजी दिग्गज क्रिकेटरनंही केलीय मोठी गुंतवणूक!

एरोस्पेस आणि डिफेन्स बिझनेसमध्ये कार्यरत आझाद इंजिनिअरिंगचा शेअर आज शुक्रवारी फोकसमध्ये होता. आज या शेअरला 5% चे अपर सर्किट लागले. कंपनीचा शेअर 1779.75 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला आहे. या तेजीमागे एक मोठे कारण आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एक इंटरनॅशनल ऑर्डर मिळाली आहे. आझाद इंजिनिअरिंगला सीमेंस एनर्जी ग्लोबल जीएमबीएच अँड कंपनी केजी, जर्मनीकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे.

असे आहेत डिटेल? -
आझाद इंजिनिअरिंगला सीमेंस एनर्जी ग्लोबल जीएमबीएच अँड कंपनी केजी, जर्मनीकडून 5 वर्षांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर मिळाली आहे. जी अॅडव्हान्स गॅस आणि त्याच्या जागतिक मागणीसाठी महत्वपूर्ण रोटेशन कंपोनेन्ट्सची निर्मिती आणि पुरवठा करते.

डिसेंबर 2023 मध्ये आला होता IPO -
डिसेंबर 2023 च्या अखेरीस लिस्ट झालेल्या आझाद इंजिनिअरिंगच्या शेअरची किंमत तेव्हापासून आतापर्यंत 199 टक्क्यांनी वधारली आहे. गुंतवणूकदारांना शेअरमधून मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. विशेष म्हणजे, आझाद इंजिनिअरिंगच्या शेअरची किंमत आयपीओ प्राइस ₹594 च्या तुलनेत 3 पट वाढली आहे. हा शेअर गुरुवारच्या ₹1697.05 या बंदच्या तुलनेत 5% ने वधारून शुक्रवारी ₹1779.75 वर खुला झाला होता.

सचिन तेंडुलकरचीहीगुंतवणूक -
माजी क्रिकेटर सचिन रमेश तेंदुलकरनेही आझाद इंजिनिअरिंगच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, सचिनने मार्च 2023 मध्ये या शेअरमध्ये 5 कोटी रुपयांची गुंतवणूक करत जवळपास 4 लाख इक्विटी शेअर घेतले आहेत.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title: azad engineering share surges 5 percent big order received from abroad; Sachin Tendulkar also has 4 lakh shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.