ऑनलाइन लोकमत
बेंगळूर, दि. ८ - आयटी क्षेत्रातल्या दिग्गज कंपनीचे प्रमुख अझीम प्रेमजींनी आपल्या संपत्तीपैकी आणखी १८ टक्के संपत्ती दान केली असून त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या दानाची किंमत ५३,२८४ कोटी रुपये झाली आहे.
विप्रो या प्रेमजींनी स्थापन केलेल्या कंपनीमधील त्यांच्या ताब्यातील शेअर्सपैकी एकूण मिळून ३९ टक्के शेअर्स अझीम प्रेमजी ट्रस्टकडे हस्तांतरीत करण्यात आले असून हा या शेअर्सच्या मिळणा-या उत्पन्नातून समाजकार्य केलं जातं. प्रेमजींचा आदर्श भारतातल्या धनाढ्यांनी ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वॉरन बफे आणि बिल गेट्स यांनी समाजासाठी संपत्ती दान करण्याचे जगभरातल्या गर्भश्रीमंतांना आवाहन केले होते, या आवाहनाला प्रतिसाद देणारे प्रेमजी हे पहिले भारतीय उद्योजक आहेत. गेल्या १५ वर्षात समाजासाठी दान करण्याचा मी प्रयत्न करत असल्याचे प्रेमजींनी म्हटले आहे. विप्रोमध्ये प्रेमजींच्या मालकिचे सुमारे ७९ टक्के शेअर असून त्यातला जवळपास ५० टक्के शेअर्स त्यांनी दान केले आहेत.