Join us

गौतम अदानींना टक्कर देणार बाबा रामदेव; असा आहे 'पतंजली'चा मोठा गेमप्लान!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 5:22 PM

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेल्या अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेल्या अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी शुक्रवारी त्यांच्या व्यवसायाबाबत मोठी घोषणा केली आहे. पतंजली समूह पुढील चार ते पाच वर्षांमध्ये आपल्या चार कंपन्या शेअर बाजारात लिस्ट करणार आहे. यासोबतच कंपनीनं आपला व्यवसाय अडीच पटीनं वाढवण्यावरही भर दिला आहे.

पतंजली समूहाचे मुख्य लक्ष खाद्यतेल व्यवसायावर आहे. जिथं सध्या अदानी विल्मरचं वर्चस्व आहे. भारताच्या खाद्यतेलाच्या बाजारपेठेत अदानी विल्मरचा वाटा सुमारे १९ टक्के आहे, तर पतंजली फूड्सचा वाटा सुमारे ८ टक्के इतका आहे. खाद्यतेलाच्या बाजारपेठेत आपला वाटा वाढवण्यासाठी पतंजली समूह पाम तेलाच्या बाबतीत स्वावलंबी होणार आहे. यासाठी पतंजली समूह १५ लाख एकरपेक्षा जास्त जागेत खजुरीची झाडं लावणार आहे. ११ राज्यांतील ५५ जिल्ह्यांमध्ये ही झाडं लावण्यात येणार आहेत. पतंजलीचा दावा आहे की कोणत्याही कंपनीद्वारे भारतातील ही सर्वात मोठी पाम लागवड ठरणार आहे.

शेअर बाजारात होणार लिस्टिंगपतंजली समूहालाही अदानी समूहाप्रमाणे शेअर बाजारात अधिकाअधिक कंपन्या लिस्ट करायच्या आहेत. सध्या पतंजली फूड्स ही एकमेव कंपनी शेअर बाजारात लिस्ट आहे. बाबा रामदेव यांची योजना आता समूहाच्या इतर ४ कंपन्यांना शेअर बाजारात लिस्ट करण्याची आहे. पतंजली आयुर्वेद, पतंजली मेडिसिन, पतंजली लाईफस्टाईल आणि पतंजली वेलनेस या चार कंपन्या आहेत. "पतंजली समूहाचा व्यवसाय अडीच पटीनं वाढून येत्या पाच ते सात वर्षांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. एवढंच नाही तर येत्या काही वर्षांत हा ग्रुप पाच लाख लोकांना रोजगारही देणार आहे", असं बाबा रामदेव म्हणाले. 

अदानींचा रेकॉर्डअॅमेझॉनचे जेफ बेझोस यांना मागे टाकत गौतम अदानी शुक्रवारी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले होते. फोर्ब्सच्या रिअल टाइम डेटानुसार, अदानी समूहाच्या शेअरमध्ये वाढ झाल्यामुळे अदानीची एकूण संपत्ती १५५.७ बिलियन डॉलर इतकी झाली. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट आणि अदानी ट्रान्समिशनचे स्टॉक सध्या विक्रमी उच्चांकावर आहेत.

टॅग्स :पतंजलीरामदेव बाबाअदानी