Join us  

पतंजलीविरोधात षडयंत्र रचलं जातंय, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 2:03 PM

Baba Ramdev : पत्रकार परिषदेत बाबा रामदेव यांनी FSSAI वर मोठा आरोप केला.

नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव  (Baba Ramdev) यांनी पतंजली (Patanjali) समूहाच्या कंपनांच्या विस्ताराबाबत शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. येत्या पाच वर्षांत पतंजली समूहाच्या चार कंपन्यांसाठी आयपीओ (IPO) आणण्याची योजना बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. 

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही येत्या पाच वर्षांत चार आयपीओ आणून पतंजली समूहाच्या पाच कंपन्यांची यादी करण्याची तयारी करत आहोत. पतंजली फूड्सनंतर पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस, पतंजली मेडिसिन आणि पतंजली लाइफस्टाइल या आमच्या चार कंपन्यांचे आयपीओ लाँच करण्याचे ध्येय असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

सध्या पतंजली फूड्स भारतीय शेअर बाजारात लिस्टेड आहे. यासोबतच कंपनीने 5 लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्याचे लक्ष्य गाठण्यासाठी कृती योजना तयार केली आहे. दरम्यान, पत्रकार परिषदेत बाबा रामदेव यांनी FSSAI वर मोठा आरोप केला. पतंजलीचे तूप जगभर विकले जाते आणि त्याच्या गुणवत्तेवर कोणताही प्रश्न उद्भवत नाही. पण, भारतात ती चाचणीत अपयशी ठरते. पतंजलीविरोधात षडयंत्र रचले जात आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. 

बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली फूड्स (Patanjali Foods) ही सध्या शेअर बाजारात लिस्टेड असलेली एकमेव कंपनी आहे आणि ती आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून देत आहे. बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेदने रिझोल्यूशन प्रक्रियेअंतर्गत रुची सोया (Ruchi Soya) 2019 मध्ये 4,350 कोटी रुपयांना विकत घेतली होती. 

ही कंपनी आधीच शेअर बाजारात लिस्ट झाली होती. दरम्यान, यावर्षी 2022 मध्ये बाबा रामदेव यांनी कंपनीचे नाव रुची सोया वरून बदलून पतंजली फूड्स केले. पतंजली फूड्सच्या स्टॉकची किंमत आठवड्यातून दर आठवड्याला वाढत आहे.

टॅग्स :रामदेव बाबाव्यवसायशेअर बाजार