Patanjali Foods: पतंजली फूड्सनं २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. पतंजली फूड्स यापूर्वी रुची सोया या नावानं ओळखली जात होती. दरम्यान, पतंजली फूड्सनं आपल्या दुसऱ्या तिमाहीमध्ये २५४.५ कोटी रुपयांचा नफा कमावल्याचं निकालातून समोर आलंय. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत पतंजली फूड्सचा नफा ११२.३ कोटी रुपये होता. कंपनीच्या त्रैमासिक आणि सहामाही निकालांचे ऑडिट केलेले नाही आणि ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीच्या आधारे वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीची कामगिरी चांगली राहिली आहे.
दुसऱ्या तिमाहीत वाढ
आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसर्या तिमाहीत ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल ७,८२१.८९ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या सहामाहीत तो १५,५८८.९८ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत, फूड अँड एफएमजीसी विभागाचा महसूल २,४८७ कोटी रुपये होता आणि एकूण महसुलात त्याचा वाटा ३१.८० टक्के होता, तर मागील तिमाहीत तो २५.१४ टक्के होता.
एबिटा मार्जिनमध्ये सुधारणा
पतंजली फूड्सचे एबिटा मार्जिन दुसऱ्या तिमाहीत ९७.७५ टक्क्यांनी वाढले आहे आणि ते ४१९.२० कोटी रुपयांवर आलेय. दुसऱ्या तिमाहीत एबिटा मार्जिन ५.३४ टक्क्यांनी वाढले, जे पहिल्या तिमाहीत २.७१ टक्के होते.
खर्च झाला कमी
कच्च्या मालाच्या किमतीत २३ टक्क्यांहून अधिक घट झाल्यामुळे पतंजली फूड्सचा एकूण खर्च १० टक्क्यांहून अधिक घसरून ७५११ कोटी रुपयांवर आला आहे. देशात आणि जागतिक स्तरावर पामतेलाच्या घसरलेल्या किमतींमुळे पतंजली फूड्सच्या खाद्यतेलाच्या किमतीत घसरण दिसून आली आहे.
पतंजली फूड्सला 'अच्छे दिन', तिमाही निकाल जाहीर; नफा वाढून २५५ कोटी रुपयांवर
पतंजली फूड्सनं २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 12:00 PM2023-11-09T12:00:00+5:302023-11-09T12:00:27+5:30