Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘पतंजली’ला कायदेशीर नोटीस, दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर केल्याचा दावा

‘पतंजली’ला कायदेशीर नोटीस, दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर केल्याचा दावा

Baba Ramdev Patanjali: दिव्य दंत मंजन टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 03:39 PM2023-05-19T15:39:31+5:302023-05-19T15:41:24+5:30

Baba Ramdev Patanjali: दिव्य दंत मंजन टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

baba ramdev patanjali toothpaste has a non vegetarian ingredients big allegation in legal notice to company | ‘पतंजली’ला कायदेशीर नोटीस, दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर केल्याचा दावा

‘पतंजली’ला कायदेशीर नोटीस, दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर केल्याचा दावा

Baba Ramdev Patanjali: बाबा रामदेव यांच्या आयुर्वेद आणि नैसर्गिक औषधांपासून उत्पादने बनवण्याचा दावा करणाऱ्या पतंजलि कंपनीला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. पतंजलिचे अनेकविध उत्पादने बाजारात उपलब्ध असून, ग्राहकांचा त्याला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे दिसत आहे. मात्र, यातच पतंजलि कंपनीविरोधात गंभीर आरोप करण्यात आला आहे. कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. कंपनीची टूथपेस्ट दिव्य दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

वकील शाशा जैन यांनी पतंजलीला आपल्या शाकाहारी उत्पादनात मांसाहाराचा वापर केल्याचा आरोप करत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे कंपनी त्यावर हिरवे लेबल लावते, म्हणजे हे उत्पादन पूर्णपणे शाकाहारी असल्याचे सांगत ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. कंपनी आपल्या उत्पादनांमध्ये शाकाहारी घटकांचा वापर करण्याचा दावा करते, परंतु त्यांच्या दिव्य दंत मंजन टूथपेस्टमध्ये सी फेन (कटलफिश) वापरण्यात आले आहे. त्यामुळे कायदेशीर नोटिशीद्वारे कंपनीकडून स्पष्टीकरणही मागितले आहे, असे जैन यांनी म्हटले आहे. 

हे ग्राहकांची दिशाभूल करणारे आहे

पतंजलीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे आणि त्यांच्या उत्पादनात दिव्य दंत मंजनच्या सी फेनच्या वापराबद्दल उत्तर मागितले आहे. कंपनी हे उत्पादन ग्रीन लेबलसह विकते. हे ग्राहकांची दिशाभूल करणारे आहे. याबरोबरच पतंजली उत्पादने वापरणाऱ्या मोठ्या संख्येने शाकाहारी ग्राहकांच्या भावनांशीही ते खेळत आहेत, असे जैन यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. शाशा जैन यांनी कायदेशीर नोटिशीची प्रतही शेअर केली आहे. कंपनी आपले उत्पादन शाकाहारी उत्पादन म्हणून बाजारात आणते, तेव्हा त्यात मांसाहारी वस्तू वापरणे हे ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन आहे. तसेच उत्पादन लेबलिंग कायद्याचे उल्लंघन आहे. माझे कुटुंब, नातेवाईक, सहकारी आणि मित्र सर्वजण या उत्पादनाचा वापर करतात आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावणारे हे पाऊल असल्याचे जैन यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, स्वतः पतंजलीची अनेक उत्पादने वापरते. परंतु आता कंपनीकडून स्पष्टीकरण येईपर्यंत, या उत्पादनांबद्दल संशय आहे. ११ मे रोजी पाठवलेल्या या नोटिशीमध्ये कंपनीला १५ दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत कंपनीने स्पष्टीकरण न दिल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. जैन यांनी ट्विटरवर कंपनीच्या उत्पादनात सी फेन (कटलफिश) वापरण्यात आल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे.

सी फेन (कटलफिश) म्हणजे नेमके काय?

समुद्रात आढळणारा कटल मासा जेव्हा मरतो, तेव्हा त्याची हाडे पाण्यात विरघळतात आणि पृष्ठभागावर तरंगू लागतात. हे एक पद्धतीचं प्राण्यांपासून बनवलेले उत्पादन आहे. जेव्हा जास्त कटल माशांची हाडे पृष्ठभागावर येतात, तेव्हा ते दुरून फेस किंवा फेनसारखे दिसतात. या कारणास्तव त्याला समुद्र फेन म्हणतात. मच्छीमार हा फेन गोळा करून वाळवून विकतात.

Web Title: baba ramdev patanjali toothpaste has a non vegetarian ingredients big allegation in legal notice to company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.