नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव (Yoga guru Baba Ramdev) यांच्या पतंजली समूहाच्या नेतृत्वाखालील रुची सोया (Ruchi Soya) आसाम, त्रिपुरा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पाम तेलाची (Palm Oil) लागवड सुरू करण्याची योजना आखत आहे. पतंजली समूहाने दोन वर्षांपूर्वी Oil processor ताब्यात घेतले आहे. (baba ramdev ruchi soya to start palm oil plantations in north east check how is benefits)
कंपनीने पाम तेलाच्या लागवडीसाठी आधीच जागेचे सर्वेक्षण केले आहे. ही लागवड शेतकऱ्यांशी करार करून केली जाईल. तसेच, आसाम, त्रिपुरा आणि इतर ईशान्य राज्यांमध्ये रुची सोया स्वतःची प्रक्रिया युनिट स्थापन करेल आणि पाम खरेदीची हमी दिली जाईल.
या राज्यात उभारले जाणार पाम ऑईल प्लांटेशन
कंपनीच्या मते, पतंजलीची ही योजना ईशान्य भागात पाम तेलाची लागवड उभारण्याची आहे. यासाठी आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूरसह इतर राज्यांमध्ये हे पाहिले गेले आहे. सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, अंदमान, गुजरात, गोवा, आंध्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात सध्या तुरळक तेल पाम लागवड आहेत.
रुची सोयाचा येतोय FPO
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, योगगुरू बाबा रामदेव तेल लागवड कधी सुरू करतील, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. रुची सोयाच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) नंतर ती सुरू केली जाऊ शकते, सध्या कंपनी FPO द्वारे गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करण्याच्या प्रक्रियेत आहे. दरम्यान, पतंजली आयुर्वेद रुची सोयामध्ये 4,300 कोटी रुपयांची हिस्सेदारी विकत आहे. बाबा रामदेव म्हणाले की, विक्रीतून जमा झालेला पैसा कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरला जाईल.
रुची सोयाने बनविले कंगाल; गेल्या 55 दिवसांपासून गुंतवणूकदारांचे होतेय नुकसान
रामदेव बाबा आपल्या ग्रुपच्या आणि त्याच्या कंपन्यांबाबत मोठमोठे दावे करत असले, तरीदेखील रुची सोयाच्या शेअरनी गुंतवणूकदारांना कंगाल केले आहे. गेल्या 55 दिवसांपासून रुची सोयाचे शेअर कमालीचे घसरले असून ज्याच्याकडे 1000 शेअर होते तो तब्बल 2.17 लाखांहून अधिक रुपयांना धुपला आहे. शेअरधारकांचे गेल्या दोन महिन्यांत 17 टक्के नुकसान झाले आहे. हे शेअर 17 टक्क्यांनी घसरले आहेत. धक्कादायक म्हणजे रामदेव बाबांनी काही दिवसांपूर्वीच रुची सोया आणि पतंजलीबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. रुची सोयाचा एनएफओ आणण्यात येणार आहे. यामुळे प्रमोटर्सची शेअरिंग कंपनीपेक्षा कमी होईल आणि कंपनीला आपल्या कर्जातून मुक्ती मिळेल. दुसरीकडे पतंजलीचा आयपीओ आणण्याचीही तयारी केली जात आहे.