योग गुरू रामदेव यांची शेअर बाजारात लिस्टेड असलेली कंपनी पतंजली फूड्सने सप्टेंबर तिमाहीतील परिणाम जारी केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये 32 टक्यांपर्यंत घसरण झाली आहे. या तिमाही दरम्यान पतंजली फूड्सने ₹112.28 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे, तो गेल्या वर्षी याच कालावधीत ₹164.27 कोटी एवढा होता.
पतंजली फूड्सचा गेल्या वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत महसूल ₹5,995.03 कोटी होता. जो या वर्षीच्या सेम तिमाहीत 42.02 टक्क्यांनी वाढून 8,514.12 कोटी झाला आहे. सप्टेंबर तिमाहीत पतंजलीच्या खाद्य व्यवसायाने 2,399.66 कोटींची विक्री नोंदवली आहे.
पतंजलीच्या शेअरची किंमत -
पतंजली फूड्सच्या शेअरमध्ये गुरुवारनंतर शुक्रवारीही विक्रीचे वातावरण होते. कंपनीच्या शेअरची किंमत 1267.95 रुपयांवर आली आहे. जी 1.91% एवढी घसरण दाखवते. मार्केट कॅपचा विचार करता कंपनीचे मार्केट कॅप 45,899.14 कोटी रुपये एवढे आहे.
यापूर्वी, गुरुवारी कंपनीच्या शेअरची किंमत 1292.65 रुपयांवर होती. ही 4.15% घसरण आहे. मार्केट कॅपचा विचार करता, 46,793.26 कोटी रुपये होती. अशा प्रकारे, केवळ एकाच ट्रेंडिंग दिवसात मार्केट कॅपिटल जवळपास 1 हजार कोटी रुपयांनी घसरले आहे.