मुंबई : बुडीत खात्यांत जमा झालेल्या कर्जांच्या समस्येवर बॅड बँकेची निर्मिती हा चांगला पर्याय ठरू शकतो, तथापि, त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांत योग्य प्रमाणात भांडवल टाकणेही आवश्यक ठरेल, असे फिच या आंतरराष्ट्रीय मानक संस्थेने आपल्या एका अहवालात म्हटले आहे.
यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणात बॅड बँकेच्या स्थापनेचा विचार मांडण्यात आला आहे. ही बँक अन्य बँकांच्या बुडित खात्यातील कर्जे विकत घेईल. तसेच त्यांची वसुली स्वत:च्या पातळीवर करील. अथवा अन्य कायदेशीर बाबी करील. अशी या मागील संकल्पना आहे.
आंतरराष्ट्रीय मानक संस्था फिचने अहवालात म्हटले की, भारतातील बँकिंग क्षेत्राची डोकेदुखी बनलेली तणावाखालील भांडवलाची समस्या सोडविण्यासाठी बॅड बँकेची निर्मिती हा चांगला उपाय होऊ शकतो. बुडित खात्यातील भांडवलाची समस्या सोडविण्यास त्यामुळे गती मिळू
शकते. तथापि, या बँकेच्या मार्गात काही मूलभूत अडचणी आहे.
सरकारी बँकांतील भांडवलाच्या टंचाईची समस्याही त्यातून
निर्माण होऊ शकते. यावर मार्ग काढण्यासाठी सरकारला मदतीचा हात पुढे करावा लागेल.
फिचने म्हटले की, २0१८-१९ या वर्षात बेसल-३ मानकाची पूर्तता करण्यासाठी ९0 अब्ज डॉलरची गरज आहे. बॅड बँकेच्या निर्मितीने या अंदाजात काही फरक होण्याची शक्यता नाही. उलट बँकांनी तणावातील भांडवलाबाबत पारदर्शीता दर्शविल्यास हा आकडा आणखी वाढू शकतो. (वाणिज्य प्रतिनिधी)
बुडीत कर्जांसाठी ‘बॅड बँक’ लाभदायक
बुडीत खात्यांत जमा झालेल्या कर्जांच्या समस्येवर बॅड बँकेची निर्मिती हा चांगला पर्याय ठरू शकतो, तथापि, त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांत योग्य प्रमाणात भांडवल टाकणेही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2017 12:50 AM2017-02-25T00:50:06+5:302017-02-25T00:50:06+5:30