Join us

JIO साठी बॅड न्यूज,केवळ 200 रूपयात वर्षभर 4G

By admin | Published: March 29, 2017 4:44 PM

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी उचललेलं पाऊल म्हणावं किंवा भारतासारख्या विशाल बाजारपेठेत स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची धडपड

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - आता याला रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी उचललेलं पाऊल म्हणावं किंवा भारतासारख्या विशाल बाजारपेठेत स्वतःचं अस्तित्व टिकवण्याची धडपड. पण, जिओच्या फ्री ऑफरनंतर टेलीकॉम कंपन्यांमध्ये एकाहून एक सरस ऑफर देण्याची शर्यतच सुरू आहे. कॅनडाची मोबाइल हॅंडसेट बनवणारी कंपनी डाटाविंड लवकरच आतापर्यंतची सर्वात धमाकेदार ऑफर घेऊन येणार आहे.
 
केवळ 200 रूपयात वर्षभर 3 जी किंवा 4 जी इंटरनेट सेवा देण्याची तयारी डाटाविंड कंपनी करत आहे. यासाठी दुरसंचार विभागात 100 कोटी रूपये गुंतवण्याची कंपनीची योजना आहे. व्हर्चुअल नेटवर्कची सेवा देण्यासाठी कंपनीने लायसन्ससाठी अर्ज केला आहे. लायसन्स मिळाल्यानंतरच कंपनी इंटरनेटची सेवा देऊ शकते. मात्र, यासाठी डाटाविंडला कोणत्यातरी कंपनीसोबत भागीदारी करण्याची आवश्यकता असणार आहे.  
 
200 रूपयात वर्षभर इंटरनेट म्हणजे ग्राहकाला केवळ 17 रूपयात महिनाभर इंटरनेट वापरता येणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत सिंह तुली यांनी याबाबत माहिती दिली.  ''जे ग्राहक महिन्याला 1000 ते 1500 रूपये खर्च करतात त्यांच्यासाठी जिओचा प्लॅन चांगला आहे पण अशा ग्राहकांची संख्या केवळ 30 कोटी आहे. उर्वरित ग्राहक मात्र केवळ 90 रूपये महिन्याला खर्च करतात त्यांना जिओची सेवा परवडणार नाही. आम्ही वर्षभर इंटरनेट सेवा देण्यासाठी 200 रूपयांपेक्षा कमी पैसे आकारू असं तुली म्हणाले.