Join us

LIC IPO: एलआयसी आयपीओची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी; चालू आर्थिक वर्षात येण्याची शक्यता कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 13:20 IST

LIC IPO Facing problems: देशातील सर्वात मोठी इन्शूरन्स कंपनी एलआयसी आयपीओ आणण्यासाठी धडपडत आहे. यामुळे एलआय़सीचा आयपीओ चालू आर्थिक वर्षात येण्याची चिन्हे काही दिसत नाहीएत.

देशातील सर्वात मोठी इन्शूरन्स कंपनी एलआयसी आयपीओ आणण्यासाठी धडपडत आहे. यामुळे एलआय़सीचा आयपीओ चालू आर्थिक वर्षात येण्याची चिन्हे काही दिसत नाहीएत. एलआयसीचा आयपीओ आणण्यामागे एक मोठे आव्हान आहे. 

आयपीओच्या तयारीत गुंतलेल्या एका मर्चंट बँकरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, या मोठ्या कंपनीच्या मूल्यांकनाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि त्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो. मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्यानंतरही या प्रकरणाशी संबंधित अनेक नियामक प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागेल.

अधिकाऱ्याने सांगितले की, आयपीओ आणण्यापूर्वी बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. याशिवाय भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI कडूनही परवानगी घ्यावी लागेल. IRDAI प्रमुखाचे पद जवळपास 7 महिन्यांपासून रिक्त आहे. या अधिकाऱ्याच्या मते, अशा परिस्थितीत एलआयसीचा आयपीओ २०२१-२२ या आर्थिक वर्षात येण्याची शक्यता फारच कमी आहे. आता या आर्थिक वर्षात केवळ ३ महिने उरले आहेत.

एलआयसीचे मूल्यांकन ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. याचे कारण म्हणजे LIC चा आकार खूप मोठा आहे आणि त्याचे उत्पादन मिश्रण देखील मिश्रित आहे. त्यात रिअल इस्टेट मालमत्ता आणि अनेक उपकंपनी युनिट्स आहेत. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, मूल्यांकनाचे काम पूर्ण होईपर्यंत शेअर विक्रीचा आकारही ठरवता येणार नाही.

टॅग्स :एलआयसीएलआयसी आयपीओ