Join us

बजाज ऑटोने पगार कपातीचा निर्णय घेतला मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 12:42 AM

कंपनीच्या मानव संसाधन विभागाने कर्मचाऱ्यांना पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये कंपनीच्या प्रगतीमध्ये सर्व कर्मचाºयांचे योगदान असल्याचे स्पष्ट केले आहे

मुंबई : एप्रिल महिन्याच्या पगारामध्ये १० टक्के कपात करण्याचा आपला निर्णय बजाज आॅटो या कंपनीने मागे घेतला आहे. या अडचणीच्या काळामध्ये मेंदूने नाही तर हृदयाने विचार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करून कंपनीने आपला निर्णय फिरविला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कंपनीच्या मानव संसाधन विभागाने कर्मचाऱ्यांना पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये कंपनीच्या प्रगतीमध्ये सर्व कर्मचाºयांचे योगदान असल्याचे स्पष्ट केले आहे. या अडचणीच्या काळात एकाही हंगामी कामगाराचे कुटुंबीय उपाशी राहणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल व लॉकडाउनच्या काळातील संपूर्ण पगार कर्मचाºयांना दिला जाईल, असे कंपनीने जाहीर केले आहे.

एप्रिल महिन्यामध्ये देशातील एकाही वाहनाची विक्री झालेली नाही. लॉकडाउनमुळे बजाज आॅटोने एप्रिल महिन्याच्या पगारामध्ये १० टक्के कपात करण्याचे जाहीर केले होते. व्यवस्थापनाने नंतर हा निर्णय बदलला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी लॉकडाउनच्या काळातील संपूर्ण वेतन सोडून देण्याचा निर्णय याआधीच जाहीर केला आहे.

टॅग्स :बजाज ऑटोमोबाइल