Bajaj Share Buyback: बजाज ऑटोनं (Share Buyback) शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. यासोबतच देशातील आघाडीच्या दुचाकी उत्पादक कंपनीनंही मोठं यशही मिळवलंय. आता बजाज ऑटोचे मार्केट कॅप महिंद्रा आणि महिंद्रापेक्षा (Mahindra and Mahindra) जास्त झालं आहे. यासह, बजाज ऑटो आता देशातील तिसरी सर्वात मोठी वाहन निर्मिती कंपनी बनलीये. बजाजच्या आधी आता केवळ मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) या कंपन्यांचा क्रमांक लागतो.मार्केट कॅप वाढलंब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, बजाज ऑटोचे मार्केट कॅप सोमवारी २.०२ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. जे महिंद्राच्या मार्केट कॅपपेक्षा १११० कोटी रुपयांनी अधिक आहे. महिंद्राचं मार्केट कॅप २.०१ लाख कोटी रुपये आहे. ऑटो सेक्टरमध्ये, मारुती सुझुकी ३.१३ लाख कोटींच्या मार्केट कॅपसह पहिल्या स्थानावर आहे आणि टाटा मोटर्स २.८९ लाख कोटींच्या मार्केट कॅपसह दुसऱ्या स्थानी आहे.
टॉप ५ कंपन्या
मारुती सुझुकी - ३.१३ लाख कोटीटाटा मोटर्स - २.८९ लाख कोटीबजाज ऑटो - २.०२ लाख कोटीमहिंद्रा अँड महिंद्रा - २.०१ लाख कोटीआयशर मोटर्स - १.०६ लाख कोटी
कंपनी शेअर बायबॅक करणार
कंपनी सुमारे ४० लाख शेअर्स बायबॅक करणार असल्याची माहिती सोमवारी बजाज ऑटोनं शेअर बाजाराला दिली. यासाठी कंपनी प्रति शेअर १० हजार रुपये देणार आहे. सोमवारी कंपनीचे शेअर्स ६९८३.८५ रुपयांवर बंद झाले. त्यानुसार कंपनीने शेअर बायबॅकमध्ये ४३ टक्के प्रीमियम भरण्याची घोषणा केली आहे.