Lokmat Money > बिझनेस न्यूज > तब्बल 89000% ची वेगवान वाढ अन् 1 बोनस शेअर, 10 हजार रुपये लावणारे झाले कोट्यधीश...

तब्बल 89000% ची वेगवान वाढ अन् 1 बोनस शेअर, 10 हजार रुपये लावणारे झाले कोट्यधीश...

बजाज फायनान्सचा अवघ्या 8 रुपयांचा शेअर आज तब्बल 7200 रुपयांवर पोहचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 06:56 PM2024-04-09T18:56:02+5:302024-04-09T18:56:16+5:30

बजाज फायनान्सचा अवघ्या 8 रुपयांचा शेअर आज तब्बल 7200 रुपयांवर पोहचला.

Bajaj Finance: growth of 89000% and 1 bonus share, 10 thousand rupees became a millionaire | तब्बल 89000% ची वेगवान वाढ अन् 1 बोनस शेअर, 10 हजार रुपये लावणारे झाले कोट्यधीश...

तब्बल 89000% ची वेगवान वाढ अन् 1 बोनस शेअर, 10 हजार रुपये लावणारे झाले कोट्यधीश...

Bajaj Finance: शेअर बाजारात अनेक असे मल्टिबॅगर स्टॉक्स आहेत, ज्यांनी दीर्घकाळात गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. अशाच स्टॉक्समध्ये बजाज ग्रुपची कंपनी असलेल्या बजाज फायनान्सचे नाव येते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना या स्टॉकने मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या काही वर्षांत बजाज फायनान्सचे शेअर्स 8 रुपयांवरुन 7000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. म्हणजेच, या स्टॉकने तब्बल 89000% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. आज (9 एप्रिल 2024) कंपनीचे शेअर्स 7200 रुपयांवर बंद झाले. दरम्यान, हे शेअर्स 8000 रुपयांचा टप्पा पार करू शकतात, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

1 बोनस शेअर अन् 10 हजारांचे झाले 1.77 कोटी 
17 एप्रिल 2009 रोजी बजाज फायनान्सचे शेअर्स 8.08 रुपयांवर होते. जर एखाद्या व्यक्तीने कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवले असते, तर त्याला 1235 शेअर्स मिळाले असते. बजाज फायनान्सने सप्टेंबर 2016 मध्ये 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. म्हणजेच कंपनीने प्रत्येक शेअरमागे 1 बोनस शेअर दिला. जर बोनस शेअर्स अॅड केले, तर एकूण शेअर्सची संख्या 2470 होते. 9 एप्रिल 2024 रोजी बजाज फायनान्सचे शेअर्स 7200 रुपयांवर आले. म्हणजेच, या 2470 शेअर्सचे सध्याचे मूल्य 1.77 कोटी रुपये आहे.

शेअर्स 8500 रुपयांपर्यंत जाऊ शकतात
बजाज फायनान्सच्या शेअर्सच्या वाढीचा कल कायम राहील, असा विश्वास देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने या शेअरला बाय रेटिंग दिले आहे. तसेच, ब्रोकरेज हाऊसने बजाज फायनान्सच्या शेअर्ससाठी 8500 रुपयांची लक्ष्य किंमत ठेवली आहे. गेल्या 10 वर्षांतदेखील बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये 3985% ची जबरदस्त वाढ झाली आहे.  बजाज फायनान्सच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 8190 रुपये आहे, तर निम्न पातळी 5780 रुपये आहे.

Web Title: Bajaj Finance: growth of 89000% and 1 bonus share, 10 thousand rupees became a millionaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.