Join us  

Bajaj Housing Finance IPO : पैसे तयार ठेवा! पुढच्या महिन्यात येऊ शकतो Bajaj समूहाच्या 'या' कंपनीचा IPO, ग्रे मार्केटमध्ये धमाका; चेक करा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 3:45 PM

Bajaj Housing Finance IPO : बजाज समूहाच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ येण्याच्या तयारीत आहे.

Bajaj Housing Finance IPO : बजाज समूहाच्या आणखी एका कंपनीचा आयपीओ येण्याच्या तयारीत आहे. बजाज फायनान्सची उपकंपनी असलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ पुढील महिन्यापासून गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत हा इश्यू ओपन होऊ शकतो.

ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स आधीच ३९ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत. मात्र, अद्याप प्राइस बँड जाहीर करण्यात आलेला नाही किंवा इश्यू उघडण्याची तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही. यावर्षी जूनमध्ये बजाज हाऊसिंग फायनान्सनं आयपीओच्या माध्यमातून ७,००० कोटी रुपये उभे करण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे दाखल केली होती आणि त्यानंतर त्याला सेबीकडून मंजुरी मिळाली आहे.

काय आहेत डिटेल्स?

सेबीकडे दाखल कागदपत्रांनुसार, प्रस्तावित आयपीओमध्ये ४,००० कोटी रुपयांपर्यंतचे नवीन इक्विटी शेअर्स जारी करणं आणि मूळ कंपनी बजाज फायनान्सकडून ३,००० कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (ओएफएस) समाविष्ट असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) निकषांचे पालन करण्यासाठी शेअरविक्री केली जात आहे, ज्यानुसार अप्पर स्तरावरील बिगर बँकिंग वित्त कंपन्यांना (एनबीएफसी) सप्टेंबर २०२५ पर्यंत स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट करणं आवश्यक आहे. नवीन इश्यूमधून मिळणारी रक्कम भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाईल

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगसेबीशेअर बाजार