Lokmat Money > बिझनेस न्यूज > Credit Card वर बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करता? पाहा कोणती कार्ड आकारतात सर्वात कमी इंटरेस्ट रेट

Credit Card वर बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करता? पाहा कोणती कार्ड आकारतात सर्वात कमी इंटरेस्ट रेट

तुम्ही क्रेडिट कार्डच्या बिलावरील मिनिमम अमाऊंट भरल्यास, थकबाकीच्या रकमेवर भरपूर व्याज आकारले जाते. त्यामुळे संपूर्ण बिल वेळेवर भरण्याचा प्रयत्न करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 04:03 PM2022-10-09T16:03:26+5:302022-10-09T16:04:10+5:30

तुम्ही क्रेडिट कार्डच्या बिलावरील मिनिमम अमाऊंट भरल्यास, थकबाकीच्या रकमेवर भरपूर व्याज आकारले जाते. त्यामुळे संपूर्ण बिल वेळेवर भरण्याचा प्रयत्न करा.

Balance carry forward on credit card See which cards charge the lowest interest rates indusind yes bank hdfc credit card | Credit Card वर बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करता? पाहा कोणती कार्ड आकारतात सर्वात कमी इंटरेस्ट रेट

Credit Card वर बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करता? पाहा कोणती कार्ड आकारतात सर्वात कमी इंटरेस्ट रेट

जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचा बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करणं तुम्हाला महागात पडतं हे जाणून घेणं तितकेच महत्त्वाचं आहे. याचाच अर्थ असा की जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या बिलावरील मिनिमम अमाऊंट भरली तर थकीत रकमेवर भरपूर व्याज आकारलं जातं. त्यामुळे संपूर्ण बिल वेळेत भरण्यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे त्यावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. परंतु काही वेळा आपल्याला एकाच वेळी संपूर्ण रक्कम भरणं अशक्य असते तेव्हा आपण त्याची मिनिमम अमाऊंट भरतो आणि बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करतो.

कॅरी फॉरवर्ड केल्यानंतर क्रेडिट कार्ड कंपनी महिन्याला 3.8 टक्क्यांपर्यंत व्याज आकारतात. हे वार्षिक 45 टक्क्यांपेक्षाही अधिक होते. एका संकेतस्थळानं पाच अशी क्रेडिट कार्ड सांगितली आहेत जी अमाऊंट कॅरी फॉरवर्ड करण्यावर कमी व्याज आकारतात.

Axis Bank Burgundy Private Credit Card महिन्याला यासाठी 1.5 टक्के रक्कम आकारते. तसंच 200 रूपये खर्च केल्यानंतर त्यावर 15 एज रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. एटीएममधून पैसे काढल्यानंतरही कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. यात अन्यही बेनिफिट्स मिळत असून कार्डाची वार्षिक फी 50 हजार रूपये आहे.

IndusInd Bank Indulge Credit Card वर दरमहा 1.79 टक्के व्याजदर आकारले जाते. हे दर वर्षी 21.48 टक्के आहे, जे इतर क्रेडिट कार्डच्या व्याजदरापेक्षा खूपच कमी आहे. कार्डधारकाला 2.5 कोटी रुपयांचा मोफत ट्रॅव्हल इन्शुरन्स मिळतो. या कार्डासाठी ग्राहकांकडून वन टाईम जॉईनिंग फीस म्हणून 2 लाख रूपये आकारले जातात.

 

HDFC Ininia क्रेडिट कार्ड मेटल एडिशन दरमहा 1.99 टक्के व्याज आकारते. हा व्याजदर वार्षिक 23.88 टक्के इतका आहे. यासह, ग्राहकाला क्लब मॅरियटचे एक वर्षासाठी सदस्यत्व मिळते. भारत आणि परदेशात अमर्यादित लाऊंज एक्सेसही मिळतात. या कार्डसाठी वार्षिक शुल्क म्हणून 12,500 रुपये आकारले जातात.

HDFC Diners Club Black Credit Card वर दरमहा 1.99 टक्के व्याज आकारले जाते. हे वार्षिक 23.88 टक्के इतके आहे. यावर तुम्हाला क्लब मॅरियट, फोर्ब्स, अॅमेझॉन प्राइम, डायनआउट पासपोर्ट, मेकमायट्रिप, ब्लॅक आणि टाइम्स प्राईसचे वार्षिक सदस्यत्व मिळते. विमानतळावर अमर्यादित लाऊंज अॅक्सेसही यात दिले जातात. या कार्डचे वार्षिक सभासदत्व 10,000 रुपये आहे.

Yes First Exclusive Credit Card ग्राहकाकडून दरमहा 1.99 टक्के व्याज आकारते. हा व्याजदर वार्षिक 23.88 टक्के इतका आहे. याशिवाय विमानतळावर लाऊंज अॅक्सेसदेखील देण्यात येतात. एका वर्षात 20 लाख रुपये खर्च केल्यास ग्राहकाला 25,000 बोनस रिवॉर्ड पॉइंट मिळतात. या कार्डची फी वार्षिक 999 रुपये आहे.

Web Title: Balance carry forward on credit card See which cards charge the lowest interest rates indusind yes bank hdfc credit card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.