Lokmat Money > बिझनेस न्यूज > या कंपनीच्या शेअर्सनी पाडला पैशांचा पाऊस; 1 रुपयांवरून पोहोचला 2100 वर, 1 लाखाचे झाले 21 कोटी

या कंपनीच्या शेअर्सनी पाडला पैशांचा पाऊस; 1 रुपयांवरून पोहोचला 2100 वर, 1 लाखाचे झाले 21 कोटी

येथे आम्ही अशाच एका स्टॉकसंदर्भात बोलत आहोत, जो अजूनही पैशांचा पाऊस पाडत आहे. या स्टॉकने काही वर्षांतच तब्बल 200000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 07:39 PM2022-06-25T19:39:30+5:302022-06-25T19:42:37+5:30

येथे आम्ही अशाच एका स्टॉकसंदर्भात बोलत आहोत, जो अजूनही पैशांचा पाऊस पाडत आहे. या स्टॉकने काही वर्षांतच तब्बल 200000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

balkrishna industries multibagger stock turned 1 lakh rupee into more than 21 crore rupee | या कंपनीच्या शेअर्सनी पाडला पैशांचा पाऊस; 1 रुपयांवरून पोहोचला 2100 वर, 1 लाखाचे झाले 21 कोटी

या कंपनीच्या शेअर्सनी पाडला पैशांचा पाऊस; 1 रुपयांवरून पोहोचला 2100 वर, 1 लाखाचे झाले 21 कोटी

शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांसाठी संयम बाळगणे अत्यंत महत्त्वाचा असते. आपणही शेअर बाजारातगुंतवणूक करत असाल अथवा करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. खरे तर, सध्या शेअर मार्केटची स्थिती फारशी चांगली नाही. मात्र, असे असतानाही काही शेअर्स जबरदस्त परतावा देत आहेत. येथे आम्ही अशाच एका स्टॉकसंदर्भात बोलत आहोत, जो अजूनही पैशांचा पाऊस पाडत आहे. या स्टॉकने काही वर्षांतच तब्बल 200000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

1 रुपयांचा जबरदस्त शेअर - 
या कंपनीचे नाव आहे, बालकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड, ही एक टायर निर्माता कंपनी आहे. बालकृष्ण इंडस्ट्रीजची (Balkrishna Industries) बाजारातील पकड जबरदस्त आहे. या कंपनीचा शेअर काही वर्षांतच 1 रुपयांवरून तब्बल 2100 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 2724.40 रुपये एवढी आहे. तर लो-लेव्हल 1681.95 रुपये एवढा आहे.

1 लाख रुपयांचे झाले 21 कोटी रुपये - 
बालकृष्ण इंडस्ट्रीजचा शेअर 7 जून 2002 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 1 रुपयांवर होता. तो अखेरच्या ट्रेडिंग डेला म्हणजेच 24 जून 2022 रोजी बीएसईवर 2131 रुपयांवर पोहोचला. या काळात या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 200000 टक्के एवढा परतावा  दिला आहे. यानुसार जर कुणी 7 जून 2002 रोजी बालकृष्ण इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती तशीच ठेवली असती, तर आज त्याचे 21.31 कोटी रुपये झाले असते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: balkrishna industries multibagger stock turned 1 lakh rupee into more than 21 crore rupee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.