Lokmat Money > बिझनेस न्यूज > या शेअरनं फक्त 4 दिवसांत दिला जबरदस्त परतावा; कंपनी म्हणते- तेजीचं कारण माहीत नाही!

या शेअरनं फक्त 4 दिवसांत दिला जबरदस्त परतावा; कंपनी म्हणते- तेजीचं कारण माहीत नाही!

गेल्या केवळ 4 दिवसांत बालकृष्ण पेपर मिल्सचा शेअर 60 टक्क्यांहून अधिक वधारला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 01:29 PM2022-12-22T13:29:37+5:302022-12-22T13:31:52+5:30

गेल्या केवळ 4 दिवसांत बालकृष्ण पेपर मिल्सचा शेअर 60 टक्क्यांहून अधिक वधारला आहे.

balkrishna paper mills share gave tremendous returns in just 4 days | या शेअरनं फक्त 4 दिवसांत दिला जबरदस्त परतावा; कंपनी म्हणते- तेजीचं कारण माहीत नाही!

या शेअरनं फक्त 4 दिवसांत दिला जबरदस्त परतावा; कंपनी म्हणते- तेजीचं कारण माहीत नाही!

पेपर आणि पेपर प्रॉडक्ट्स इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या बालकृष्ण पेपर मिल्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे. गेल्या केवळ 4 दिवसांत बालकृष्ण पेपर मिल्सचा शेअर 60 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. कंपनीचा शेअर गुरुवारीही 10 टक्क्यांनी चढून 50.75 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. मात्र, कंपनीच्या शेअर्समध्ये एवढी तेजी कशी आली हे आपल्या माहीत नाही, असे कंपनीने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी बऱ्याच बल्क डील झाल्या आहेत.

शेयर्सचा व्हॉल्यूम वाढण्याबरोबरच प्राइस मूव्हमेंटसंदर्भात बालकृष्ण पेपर मिल्सने (Balkrishna Paper Mills) एक्सचेंजला सांगितले, की शेअर प्राइस आणि व्हॉल्यूमवर परिणाम करणारी कुठलीही माहिती  आमच्याकडे नाही. गेल्या 2 ट्रेडिंग सेशनमध्य कंपनीचा शेअर 20-20 टक्क्यांनी वाढला आहे. याच बरोबर बालकृष्ण पेपर मिल्सचे शअर सोमवारी 8 टक्क्यांहून अधिक वर गेले होते.  कंपनीच्या शेअची 52 आठवड्यांतील सर्वोच्च पातळी58.45 आहे तर निचांकी पातळी 25.05 रुपये एवढी आहे

बालकृष्ण पेपर मिल्सच्या शेअर्सच्या बुधवारी 4 बल्क डील झाल्या. या डील्स 44.73 ते 46.20 रुपयांच्या रेंजमध्ये  झाल्या. बालकृष्ण पेपर मिल्स, सियाराम पोद्दार ग्रुपचा एक भाग आहे. ग्रुप का व्यवसाय टेक्सटाइल्स, गारमेंट्स यार्न, फर्निशिंग आणि पेपर होम सेगमेंटमध्ये आहे. कंपनी कोटेड डुप्लेक्स बोर्ड्स तयार करते. याचा वापर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये पॅकेजिंगसाठी केला जातो. शेवटच्या एका वर्षात बालकृष्ण पेपर मिल्सच्या शेअर्समध्ये जवळपास 82 टक्क्यांची तेजी आली आहे. कंपनीचे मार्केट कॅप जवळ 52 कोटी रुपयांचे आहे. याच बरोबर कंपनीत प्रमोटर्सची भागदारी 58.70 टक्के एवढी आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: balkrishna paper mills share gave tremendous returns in just 4 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.