Join us

नव्या रचनेतील करदात्यांची ‘बल्ले बल्ले’! ७५ हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन, जाणून घ्या स्लॅब...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 5:51 AM

सरकारने स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये केली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लाेकसभा निवडणूक झाल्यानंतर माेदी ३.० अर्थसंकल्पातून काय मिळणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले हाेते. सरकारने आयकरामध्ये काेणतीही वाढ न करता नव्या कररचनेत असलेल्या करदात्यांना दिलासा दिला आहे. 

सरकारने स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ७.७५ लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना काेणताही कर भरावा लागणार नाही. त्याचवेळी जुन्या कररचनेत काेणताही बदल करण्यात आलेला नसून या रचनेतील करदात्यांना दिलासा मिळालेला नाही.सरकारने दाेन वर्षांपूर्वी नवी कररचना सादर केली हाेती. तर गेल्या वर्षी सर्वांसाठी नवी कर रचनाच निश्चित केली हाेती. ज्यांना जुनी कर रचना हवी हाेती, ती निवडण्याचा पर्यायही देण्यात आला. 

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने नवी रचना आकर्षक करण्यासाठी उत्पन्नाचे टप्पे वाढविले हाेते. यावेळी याच टप्प्यांमध्ये बदल केलेला आहे.

आधी किती हाेता आणि आता किती लागणार टॅक्स ?जुना टप्पा    कर    कराची रक्कम     नवा टप्पा     कर     कराची रक्कम०-३ लाख     ०     ०    ०-३ लाख     ०     ०३-६ लाख     ५%     १५ हजार*     ३-७ लाख     ५%     २० हजार*६-९ लाख     १०%     ३० हजार*     ७-१० लाख     १०%     ३० हजार*९-१२ लाख     १५%     ४५ हजार*     १०-१२ लाख     १५%     ३० हजार*१२-१५ लाख     २०%     ६० हजार*     १२-१५ लाख     २०%     ६० हजार*१५-२० लाख     ३०%     १.५ लाख*     १५-२० लाख      ३०%     १.५ लाख*एकूण        ३.० लाख*            २.९० लाख*

फायदा किती?१७,५०० रुपयांपर्यंत कर बचत नव्या टप्प्यातील बदलांमुळे करदात्यांची हाेणार आहे.६ ते ७ लाख रुपये उत्पन्न असलेल्यांची ५ % करबचत होणार आहे.९ ते १० लाख रुपये उत्पन्न असलेल्यांचीदेखील ५ % करबचत होणार आहे.१५.७५ लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना १ लाख ५७ हजार ५०० रुपये कर द्यावा लागत हाेता.टप्पे बदलल्यामुळे या उत्पन्नगटातील करदात्यांना आता १.४० लाख रुपये कर द्यावा लागेल.

७.७५लाखरुपयांचे उत्पन्न करमुक्त असेल. सरकारने ७५ हजार रुपयांची सामान्य वजावट जाहीर केली आहे. आयकर कायद्याच्या कलम ८७अ नुसार २० हजार रुपयांचा कर सरकार माफ करते. 

३ ते ७ लाखरुपये उत्पन्नगटातील करदात्यांना काेणताही कर भरावा लागणार नाही. 

टॅग्स :इन्कम टॅक्सअर्थसंकल्प 2024निर्मला सीतारामन