Join us

बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान कंपनीची स्थापना करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 5:45 AM

राज्यात बांबू क्षेत्राचे सशक्तीकरण करण्यासाठी अनेक एजन्सीचा समावेश करून बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, महाराष्ट्र या कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला.

मुंबई : राज्यात बांबू क्षेत्राचे सशक्तीकरण करण्यासाठी अनेक एजन्सीचा समावेश करून बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, महाराष्ट्र या कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला.बांबू क्षेत्राच्या सर्वांगिण विकासाकरीता कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदर समितीने अहवाल शासनाला सादर केला असून शासनाने समितीच्या शिफारसी सुध्दा स्विकारल्या आहेत.समितीने राज्य सरकार, ट्रस्ट,खाजगी कंपन्या, बँका आणि इतर चांगल्या संघटना एकत्रित येवून महाराष्ट्र बांबू प्रमोशन कंपनी अर्थात बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान सुरू करावी असे सुचविले आहे.हे राज्य शासन व इतर संस्थांकडून प्रारंभी कॉर्पस फंडाने सुरूवात करता येईल तसेच सीएसआर निधीचाही वापर करता येईल, नंतर सदर कंपनी स्वत:च्या उत्पन्नातून विविध प्रकल्पाची अंमलबजावणी करेल. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.>शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनानागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नियंत्रणाखालील शिक्षकेतर कर्मचाºयांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या योजनेचा लाभ पाचव्या वेतन आयोगानुसार ८०००-१३५०० व त्याहून कमी वेतन घेणाºया अधिकारी-कर्मचाºयांना संबंधित पदावर १२ वर्षांच्या नियमित सेवेनंतरच मिळेल.