Join us

डॉक्टरांना भेटवस्तू देण्यावर येणार मनाई

By admin | Published: October 11, 2015 10:25 PM

डॉक्टरांना भेटवस्तू, रोख रक्कम आदी देण्यावर सरकार लवकरच औषधी उत्पादक कंपन्यांना बंदी घालणार आहे.या औषधी कंपन्यांसाठी सरकार समान विपणन व्यवहार संहिता

नवी दिल्ली : डॉक्टरांना भेटवस्तू, रोख रक्कम आदी देण्यावर सरकार लवकरच औषधी उत्पादक कंपन्यांना बंदी घालणार आहे.या औषधी कंपन्यांसाठी सरकार समान विपणन व्यवहार संहिता लागू करण्याचा सरकार विचार करीत आहे. त्यानुसार या कंपन्यांनी डॉक्टरांना भेटवस्तू देण्यावर बंदी घालण्याची शक्यता आहे.यासंदर्भात फार्मास्युटिकल्स विभागाने फार्मा विपणन व्यवहारावर समान संहिता (यूसीपीएमपी) जारी केली आहे. यंदा ही संहिता जानेवारीपासून स्वैच्छिक रूपात लागू करण्यात आली आहे.या संहितेनुसार फार्मा कंपन्या डॉक्टरांना तणावावर उपचार करणाऱ्या औषधी नमुना म्हणून देऊ शकत नाहीत. याशिवाय या कंपन्या डॉक्टरांना परदेश यात्रा घडवून आणू शकत नाहीत. एखाद्या कंपनीने हा प्रकार केल्यास त्या कंपनीला त्यांच्या संघटनेतून बाद करण्यात येईल.एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत औषधी कंपन्यांना ही संहिता ऐच्छिक होती, आता ती सक्तीची केली जाणार आहे. या संहितेवर नव्याने विचार सुरू आहे. याबाबत सरकार उयोग, भारतीय चिकित्सा परिषद यांच्याशी चर्चा करणार आहे.