नवी दिल्ली : कोरोना साथीचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच असल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा बंद ठेवण्याच्या निर्णयाला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासंदर्भात नागरी हवाई वाहतूक खात्याने म्हटले आहे की, मालवाहतूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांसाठी ही बंदी लागू असणार नाही. कोरोना साथीमुळे विदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी वंदे भारत मोहिमेच्या अंतर्गत भारतातून विमाने पाठविली जातात. त्या विमानांनादेखील ही बंदी लागू नाही. कोरोना साथीमुळे भारतात अनेक विदेशी नागरिक अडकले होते. त्यांना घेऊन जाण्यासाठी आतापर्यंत इतर देशांच्या विमानांनी भारतात २,५०० फेºया केल्या. त्यांच्या प्रवासी वाहतुकीला भारताने परवानगी दिली होती.
काही देशांसोबत करार
६ मे ते ३० जुलै या कालावधीत वंदे भारत मोहिमेमधील विमानांनी २,६७,४३६ व अन्य चार्टर्ड विमानांनी ४,८६,८११ प्रवाशांची ने-आण केली.
कोरोना साथीच्या काळातदेखील काही प्रमाणात विमानसेवा सुरू राहावी म्हणून अमेरिका, फ्रान्स, जर्मन, कुवेत या देशांबरोबर भारताने करार केला होता.
दोन्ही बाजूंना अडकलेल्या प्रवाशांना आपल्या मायदेशी जाता यावे म्हणून ही विमानसेवा सुरू ठेवण्यात आली.
भारतातील आंतरराष्ट्रीय विमानसेवेवरील बंदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
कोरोना साथीमुळे भारतात अनेक विदेशी नागरिक अडकले होते.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:37 PM2020-08-01T23:37:36+5:302020-08-01T23:37:49+5:30