Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्सला नव्या पॉलिसींच्या विक्रीवर ईडीने घातली बंदी

रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्सला नव्या पॉलिसींच्या विक्रीवर ईडीने घातली बंदी

इर्डाचा निर्णय; मालमत्ता विक्रीही नाही करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 03:14 AM2019-11-08T03:14:07+5:302019-11-08T03:14:30+5:30

इर्डाचा निर्णय; मालमत्ता विक्रीही नाही करता येणार

A ban on the sale of new policies to Reliance Health Insurance | रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्सला नव्या पॉलिसींच्या विक्रीवर ईडीने घातली बंदी

रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्सला नव्या पॉलिसींच्या विक्रीवर ईडीने घातली बंदी

मुंबई : विमा कंपन्यांचे नियंत्रण करणाऱ्या द इन्श्युरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी आॅफ इंडिया (इर्डा)ने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्स कंपनीला ग्राहकांच्या नव्या विमा पॉलिसी काढण्यास बंदी घातली आहे. ज्या ग्राहकांच्या पॉलिसी याआधी काढल्या आहेत, त्यांच्या क्लेमची रक्कमही आपल्याकडे जमा करण्याचे आदेश दिले. रिलायन्सला आपल्या मालमत्ता परस्पर विकण्यावरही बंदी घातली आहे. अनिल अंबानी समूह आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून, रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्सने आॅक्टोबर २0१८ व आॅगस्ट २0१९ मध्ये दिलेल्या सूचनांचेही पालन न केल्याने इर्डाने हे आदेश दिले. ते बुधवारपासून अंमलात आले आहेत. ग्राहकांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे इर्डाने म्हटले आहे.

ग्राहकाने आरोग्यविषयक क्लेम केल्यास कंपनी त्यांचे पैसे देईल का, याची खात्री इर्डाला नसल्यामुळेच हे आदेश काढण्यात आले आहेत. संबंधित निर्णयानुसार रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्सच्या सर्व मालमत्तांचा वापर (प्रसंगी विक्री) करून पॉलिसीधारकांचे क्लेम सेटल करणे इर्डाला शक्य होणार आहे. म्हणजेच प्रसंगी या कंपनीच्या मालमत्ताही इर्डा ताब्यात घेऊ शकेल.

सर्वच कंपन्या कर्जाखाली
ज्या ग्राहकांनी पॉलिसी काढल्या आहेत, त्यांचे हित आम्ही यापुढे पाहू, असे इर्डाने म्हटले आहे. अनिल अंबानी यांच्या समूहातील सर्वच कंपन्या कर्जाच्या बोज्याखाली वा तोट्यात आहेत. कर्जाच्या परतफेडीसाठी आपल्या मालमत्तांची विक्री करण्याचे संकेत अनिल अंबानी यांनी दिले होते. बहुधा त्याचमुळे या मालमत्तांवर पुढे-मागे टांच आणण्याचा इर्डाचा विचार असावा, असे या आदेशामुळे स्पष्ट दिसत आहे.

Web Title: A ban on the sale of new policies to Reliance Health Insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.