नवी दिल्ली : बँकांतील घोटाळे रोखण्यासाठी दुस-याच्या बँक खात्यात पैसे टाकण्यास स्टेट बँक आॅफ इंडियाने बंदी घातल्याचे वृत्त काही इंग्रजी व हिंदी वेबसाइट्नी दिले आहे. त्यानुसार आता ग्राहकांना केवळ स्वत:च्याच खात्यात पैसे जमा करता येतील. आयकर विभागाच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.नोटाबंदीच्या काळात अनेक बँक खात्यांत ५00 आणि १000 रुपयांच्या बेहिशेबी नोटा जमा करण्यात आल्या होत्या. याचा आयकर विभागाने पाठपुरावा केला तेव्हा, ही रक्कम आम्ही खात्यावर भरलेलीच नसून अन्य कुणी तरी आमच्या खात्यावर पैसे टाकले, अशी भूमिका अनेक खातेधारकांनी घेतली. त्यामुळे दुसºया व्यक्तीला खात्यात पैसे टाकण्यास अटकाव करण्याची शिफारस आयकर विभागाने केली होती. त्यानुसार, एसबीआयने आता हा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या नियमानुसार आता, कोणत्याही बँक ग्राहकास आपल्या खात्यावर रोख रक्कम भरण्यासाठी स्वत:च शाखेत जावे लागेल. कोणाच्याही बँक खात्यात पैसे जमा झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित खातेधारकावरच राहील.एसबीआयच्या नव्या नियमानुसार, विशेष परवानगी असल्यास काही ठरावीक व्यक्तींना दुसºयांच्या खात्यावर पैसे जमा करता येतील. उदा. एखादा मुलगा आपल्या आईच्या खात्यावर पैसे भरू शकेल. तथापि, त्यासाठी बँकेत विशेष फॉर्म भरून देऊन परवानगी घ्यावी लागेल. तसेच आईचे परवानगी देणारे पत्र सोबत आणावे लागेल. या पत्रावर आईची सही अथवा अंगठा असणे आवश्यक असेल.>आॅनलाइन व्यवहारांना मात्र सूटहा नियम केवळ बँक शाखेत रोख पैसे भरण्यासाठी आहे. आॅनलाइन व्यवहारांना नियमातून सूट देण्यात आली आहे. म्हणजेच आॅनलाइन पद्धतीने तुम्ही दुसºयाच्या खात्यावर पैसे भरू शकता. याशिवाय ग्रीन कार्ड आणि इंस्टा डिपॉझिट पद्धतीनेही दुसºया खात्यावर पैसे भरण्याची मुभा असेल. आॅनलाइन भरणा नियमातून का वगळण्यात आला, याचे स्पष्टीकरण बँकेने दिलेले नाही.
दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा करण्यास एसबीआयकडून बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 12:25 AM