Lokmat Money > बिझनेस न्यूज > दणका : स्पाईसजेटची ५० टक्के उड्डाणे रोखली

दणका : स्पाईसजेटची ५० टक्के उड्डाणे रोखली

कारणे दाखवा नोटिसीला स्पाईसजेटने दिलेले उत्तर लक्षात घेता उड्डाण संख्या मंजूर उड्डाणांच्या ५० टक्क्यांइतकी मर्यादित करण्यात यावी. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 09:58 AM2022-07-28T09:58:07+5:302022-07-28T09:58:39+5:30

कारणे दाखवा नोटिसीला स्पाईसजेटने दिलेले उत्तर लक्षात घेता उड्डाण संख्या मंजूर उड्डाणांच्या ५० टक्क्यांइतकी मर्यादित करण्यात यावी. 

Bang: 50 percent of SpiceJet flights grounded | दणका : स्पाईसजेटची ५० टक्के उड्डाणे रोखली

दणका : स्पाईसजेटची ५० टक्के उड्डाणे रोखली

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : विमानांतील तांत्रिक बिघाडामुळे वादात सापडलेली हवाई वाहतूक कंपनी स्पाईसजेटची ५० टक्के विमाने नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) ८ आठवड्यांसाठी रोखली. मंजूर उड्डाणांच्या केवळ ५० टक्केच उड्डाणे करावी, असा आदेश डीजीसीएने दिला.
डीजीसीएने म्हटले की, कारणे दाखवा नोटिसीला स्पाईसजेटने दिलेले उत्तर लक्षात घेता उड्डाण संख्या मंजूर उड्डाणांच्या ५० टक्क्यांइतकी मर्यादित करण्यात यावी. 

कंपनी काय म्हणते? 
स्पाईसजेटने एक निवेदन जारी करून आपली भूमिका मांडली होती. कंपनीने म्हटले होते की, डीजीसीएने शोधलेले १० विमानातील दोष व बिघाड  कंपनीने दुरुस्त केले आहेत. ही १० विमाने पुन्हा हवाई वाहतूक सेवेत सहभागीही झाली आहेत. डीजीसीएने निरीक्षण नोंदविल्यानंतर लगेचच दुरुस्ती करण्यात आली आहे. 

 

Web Title: Bang: 50 percent of SpiceJet flights grounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.