Join us  

Adani Group च्या समर्थनार्थ पुढे आले बांगलादेशचे मंत्री, केलं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 5:42 PM

हिडनबर्गचा रिपोर्ट समोर आल्यानंतर गौतम अदानी यांच्या व्यवसायात भूकंप आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

हिडनबर्गचा रिपोर्ट समोर आल्यानंतर गौतम अदानी यांच्या व्यवसायात भूकंप आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स सातत्यानं खाली घसरत आहेत. पण अशातच  बांगलादेशचे ऊर्जा आणि खनिज संसाधन राज्यमंत्री नसरुल हमीद हे गौतम अदानींच्या समर्थनार्थ पुढे आलेत. बांगलादेशला मार्चच्या पहिल्या आठवड्यात भारताच्या अदानी पॉवर प्लांटमधून वीज मिळेल. अदानींच्या वीज पुरवठ्याबाबत कोणतीही अनिश्चितता नाही असे वक्तव्य हमीद यांनी केले. उर्जा राज्यमंत्री नसरुल हमीद यांनी सांगितले की, मार्चमध्ये अदानीची वीज राष्ट्रीय ग्रीडशी जोडली जाईल. किंमतीबाबत कोणतीही अडचण नाही. या विजेची किंमत पायरा वीज केंद्रापेक्षा जास्त असणार नाही. याशिवाय बांगलादेशला एप्रिलमध्ये अदानींच्या दुसऱ्या युनिटमधून वीज मिळणार आहे.

अदानींच्या विजेबाबत जे बोलले जात आहे त्याला कोणताही आधार नाही. आम्हाला स्पर्धात्मक बाजार दरात वीज मिळेल यात काही शंका नाही. मार्चमध्ये पहिल्या युनिटमधून 750 मेगावॅट वीज मिळेल. एप्रिलमध्ये दुसऱ्या युनिटमधून आणखी 750 मेगावॅट वीज मिळेल. 'अखंडित वीज देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही हमीद यांनी स्पष्ट केले.

300 मेगावॅटचा पॉवर प्लांटगॅसचे दर काहीसे स्थिर आहेत. उद्योगांमध्ये गॅस पुरवठा अखंडित राहावा, हा आमचा प्रयत्न आहे, आम्ही वीजेतील गॅसचे प्रमाणही वाढवू, जेणेकरुन फेब्रुवारी ते मार्च अखेरपर्यंत विजेची स्थिती चांगली राहील. कोळशावर चालणारे पॉवर प्लांट एकामागून एक आमच्याकडे येणार आहेत. बारिसालमध्ये 300 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारला जाईल, अशी आशा असेही ते म्हणाले. 

सर्वांनी अदानी प्रकल्पाचा दौरा केलाआयातीत विजेच्या उपलब्धतेबाबतच्या अनिश्चिततेवर राज्यमंत्री म्हणाले की, मला वाटते की हे सर्व वेडेपणाचे लक्षण आहे. आम्ही स्वतः अदानी पॉवर प्लांट बघायला गेलो होतो. आमची टीम गेली, मी तिथे होतो. त्यांनी आम्हाला वीज देण्याचे वचन दिले होते. आम्ही फेब्रुवारीच्या अखेरीस एक तारीख निश्चित केली असल्याने, ती आमची COD (व्यावसायिक ऑपरेशनची तारीख) असेल. सीओडी असणे म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यात वीज मिळण्याची अपेक्षा आहे, असेही हमीद यांनी स्पष्ट केले.

करार कायम राहणारअदानींसोबतचा हा करार कायम राहील आणि तो आणखी वाढवला जाईल. हे जागतिक किमती आणि निर्देशांकांवर अवलंबून असते. आमच्या करारानुसार आम्ही वीज आणू, असेही त्यांनी नमूद केले. कोळशाच्या किमतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले, कोळशाची किंमत सध्याच्या काळानुसार घेतली तर आम्हाला वीज स्पर्धात्मक दरात मिळेल.

टॅग्स :गौतम अदानीबांगलादेशवीज