लोकमत न्यूज नेटवर्क : अलीकडच्या काळात बँकांच्या डिजिटल व्यवहारांत वाढ झाली आहे. या वाढीबरोबरच सायबर गुन्हेही वाढत चालले आहेत. जनजागृतीचे अभियान राबवूनही अनेकदा ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे निदर्शनास येत आहे.
रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार
- सिटीझन सायबर फायनान्शिअल फ्रॉडच्या (सीसीएफएफ) प्रकरणांत गेल्या पाच वर्षांत २१ पट वाढ झाली आहे.- या अशा घोटाळ्यांतून रक्कम हडपण्याचे प्रमाण ३०० टक्क्यांनी वाढले आहे.
कार्ड-इंटरनेटद्वारे गैरव्यवहाराची प्रकरणे
२०२०-२१ - ६९,४१०
२०१६-१७ - ३,२२३
गैरव्यवहाराची रक्कम
२०२०-२१ - २०० कोटी
२०१६-१७ - ४५.५६ कोटी
सर्वाधिक घोटाळे खासगी बँकांच्या ग्राहकांच्या बाबतीत झाले
कोटक महिंद्रा ६४.२० कोटी रु.
ॲक्सिस २९.६२ कोटी रु.
आयसीआयसीआय २५.७४ कोटी रु.
अमेरिकन एक्स्प्रेस १२.०४ कोटी रु.
भारतीय स्टेट बँक १२.६० कोटी रु.
सर्वाधिक घोटाळे कोणत्या राज्यांत?
महाराष्ट्र - २६,५२२
दिल्ली - ७,७७४
तामिळनाडू - ५,६५९
हरियाणा - ५,६०५
गुजरात - ४,६७१