नवी दिल्लीः सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आणि भारतीय लष्करामध्ये एक करार झाला आहे. याअंतर्गत ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा बँकेकडून पुरवण्यात येणार आहेत. सरकारी बँकेनं सांगितलं की, लष्कराबरोबर झालेल्या करारांतर्गत जवान खातेधारकांना निःशुल्क व्यक्तिगत दुर्घटना विमा संरक्षण, 15 लाख ते 50 लाख रुपये हवाई दुर्घटना विमा संरक्षण आणि मासिक वेतनाच्या तिप्पट ओव्हरड्राफ्ट सुविधा देण्यात येणार आहे.
भारतीय लष्करानं पेन्शन धारकांसाठी 70 वर्षांच्या वयाची अट ठेवली आहे. या करारावर भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल हर्ष गुप्ता आणि बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक विक्रमादित्य सिंह यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 9500हून अधिक शाखा असलेली दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय लष्करी जवान आणि सेवानिवृत्त जवानांना चांगल्या सुविधा पुरविणार आहे.
बँक ऑफ बडोदा अन् भारतीय लष्करात करार, जवानांना मिळणार तिप्पट ओव्हरड्राफ्ट सुविधा
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आणि भारतीय लष्करामध्ये एक करार झाला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 10:40 AM2019-10-03T10:40:58+5:302019-10-03T10:41:30+5:30