Join us

Bank of Baroda : स्वस्तात घर-मालमत्ता खरेदीची संधी, बँक ऑफ बडोदाकडून होणार मालमत्तांचा लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 10:49 AM

Bank of Baroda : या सणासुदीत तुम्ही तुमचे स्वतःचे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

ठळक मुद्देहा लिलाव 22 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या अधिकृत ट्विटर याबाबत माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात घर खरेदी (Residential Property) करण्याची संधी मिळत आहे. या सणासुदीत तुम्ही तुमचे स्वतःचे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. बँक ऑफ बडोदा मालमत्तेचा लिलाव करणार आहे. दरम्यान, हा लिलाव 22 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. (Bank Of Baroda Is Give Golden Opportunity To Buy Property 22 October 2021)

बँकेद्वारे लिलाव केली जाणारी ही मालमत्ता डिफॉल्टच्या यादीत आली आहे. यामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी मालमत्तांचा समावेश आहे. याबाबतची माहिती IBAPI ने  (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) दिली आहे.

कधी होणार लिलाव?बँक ऑफ बडोदाने  (BOB) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, 22 ऑक्टोबर 2021 रोजी मेगा ई-लिलाव केला जाईल. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्तेचा ई-लिलाव केला जाईल. तुम्ही येथे वाजवी किंमतीत मालमत्ता खरेदी करू शकता.

कोठे करावे लागेल रजिस्ट्रेशन?बँक ऑफ बडोदा मेगा ई-लिलावासाठी इच्छुक बोलीदारांना  e bkray पोर्टल https://ibapi.in/ वर रजिस्ट्रेशन करावे लागेल. या पोर्टलवर 'बिडर्स रजिस्ट्रेशन' वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे रजिस्ट्रेशन करावे लागेल.

KYC डाक्युमेंटची लागेल आवश्यकताबोलीदाराला आवश्यक केवायसी (KYC) डाक्युमेंट अपलोड करावे लागतील. ई-लिलाव सेवा प्रदात्याद्वारे केवायसी डॉक्युमेंटची पडताळणी केली जाईल. यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो.

अधिक माहितीसाठी 'या' लिंकवर क्लिक करामालमत्तेच्या लिलावाविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही  https://ibapi.in/https://www.bankofbaroda.in/e auction.htm?utm_source=SM&utm_medium=Post&utm_campaign=MegaAuction_km या लिंकला भेट देऊ शकता

टॅग्स :बँकव्यवसाय