देशातील तिसऱ्या क्रमांकांची सरकारी बँक 'बँक ऑफ बडोदा'नं आपल्या डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. याद्वारे ग्राहक आपल्या ठिकाणाहून आणि आपल्या वेळेनुसार कोणत्याही कागदपत्रांच्या प्रक्रियेद्वारे ऑनलाइनचं कर्ज मिळवू शकतो. आता घर किंवा कारच्या लोनसाठी ग्राहकांना बँकेची चक्कर मारावीही लागणार नाही. तसंच अवघ्या काही मिनिटांमध्ये बँक ऑफ बडोदाकडून ग्राहकांना रिटेल लोन देण्यात येणार आहे. तर होम लोन आणि कार लोन किंवा पर्सनल लोनसाठी ग्राहाकांचा अर्ज अर्ध्या तासांत मंजूर करण्यात येईल.बँकेचे विद्यमान ग्राहक जे ऑफलाइन किंवा ऑनलाइन पार्टनर चॅनलवर खरेदी करतील त्यांच्यासाठी प्री अप्रुव्ह्ड मायक्रो फायनॅन्स लोन देण्यात येणार आहे. ग्राहकांनी हे कर्ज घेतल्यानंतर त्यांना नियमित हप्त्यांद्वारे ते फेडावं लागेल. याव्यतिरिक्त ग्राहकांना आवश्यक असल्यास ग्राहक ती रक्कम आपल्या बचत खात्यात मागवू शकतात आणि त्यानंतर ती रक्कम त्यांना ईएमआयद्वारेही ३ ते १८ महिन्यांमध्ये फेडता येईल. बँक ऑफ बडोदाच्या डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्मद्वारे केवळ अर्ध्या तासांत होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनही मंजुर केलं जाणार आहे. बँकेच्या या नव्या सुविधेचा लाभ ग्राहकांना बँकेचं संकेतस्थळ, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंगद्वारेही घेता येणार आहे. याव्यतिरिक्त बँक ग्राहकांना फिक्स डिपॉझिटच्या अगेंस्टही लोन देत आहे. ज्या ग्राहकांची या बँकेत एफडी आहे त्यांना मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंगद्वारे त्वरित लोन देण्यात येणार आहे.
अर्ध्या तासांत होणार होम लोन मंजूर; 'या' सरकारी बँकेनं सुरू केली नवी सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 5:43 PM
ग्राहकांना कोणत्याही ठिकाणाहून आणि आपल्या वेळेनुसार कागदपत्रांच्या कोणत्याही प्रक्रियेद्वारे आता कर्ज मिळवता येणार आहे.
ठळक मुद्दे डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्मद्वारे केवळ अर्ध्या तासांत कर्ज मिळणारबँकेत एफडी असलेल्या ग्राहकांनाही एफडीच्या अगेंस्ट कर्ज देण्यात येणार