नवी दिल्ली - बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda) ग्राहकांसाठी एक चांगली योजना आणली आहे. अवघ्या 5 रुपयांमध्ये बँकेमध्ये पेन्शनर बचत खातं उघडता येणार आहे. या बचत बँक खात्यात 2 महिन्यांच्या पेन्शन रकमेमध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते. यामध्ये कोणतंही कर्ज दिलं जात नाही तर हे खातं ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे. फक्त 5 रुपयांनी उघडलेल्या या खात्यामध्ये अनेक खास सुविधा देण्यात आल्या आहेत. बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी पेन्शनधारकसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये 25 हजार रुपयांच्या धनादेशावर तात्काळ पत सुविधा मिळते.
खात्यामध्ये, फ्री डेबिट कार्ड, बडोदा कनेक्ट / इंटरनेट बँकिंग आणि बॉबकार्ड्स सिल्व्हर, वर्षासाठी एक लाख रुपयांपर्यंत अपघात विमा, अशा खास सुविधा उपलब्ध आहे. तसेच शहरातील कोणत्याही शाखेत रोख रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. यामध्ये प्रत्येक हजारासाठी 2.50 रुपये दराने शुल्क आकारलं जातं. खात्यात पॅन रजिस्टर असल्यास डेबिट कार्ड असलेल्या कॅश मशीनमध्ये दररोज दोन लाखांपर्यंत रोख रक्कम आणि खात्यात पॅन नोंदणीकृत नसलेल्यांसाठी 49,999 रुपयांपर्यंत जमा करण्याची परवानगी आहे.
बँक ऑफ बडोदाने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही मशीनमध्ये दररोज 20 हजार रुपयांपर्यत कार्डलेस व्यवहार करू शकता. मशीनमध्ये खाते क्रमांक टाकून ही सुविधा मिळवू शकता. ठेवीवर मिळालेले व्याज तिमाहीत खात्यात जमा केलं जाईल. महिना संपायच्या 15 दिवसांच्या आतमध्ये खात्यात व्याज जमा करणं महत्त्वाचं आहे. पासबुक पूर्णपणे विनामूल्य असून डुप्लिकेट पासबुक मिळविण्यासाठी 100 रुपये जमा करावे लागतात. पहिल्या वर्षासाठी विनामूल्य डेबिट कार्ड उपलब्ध आहे. त्यानंतर दरवर्षी 100 रुपये दराने शुल्क आकारले जाते. चिप आधारित क्रेडिट कार्ड 1 वर्षासाठी अपघाती मृत्यू विमा संरक्षण 1 लाख दिले जाते.
जर ग्राहक दोन वर्षांपासून खात्यात कोणताही व्यवहार करत नसेल तर ते खाते निष्क्रिय केले जाते. अशा सर्व बचत खात्यांमध्ये व्याज आकारले जाते. निष्क्रिय खाती सुरू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी कागदपत्र-फोटो, स्वाक्षरी सबमिट कराव्या लागतील. खातं बंद करण्यासाठी बँकेला लेखी कळवावे लागेल. खाते बंद करण्यासाठी संबंधित पासबुक, डेबिट कार्ड आणि न वापरलेला चेक अर्जासोबत जमा करावा लागेल. खात्यात सर्वप्रथम ठेव झाल्यानंतर 14 दिवसांच्या आत ते बंद केल्यास कोणतंच शुल्क आकारलं जाणार नाही. मात्र एक वर्षाच्या आत बंद करण्यासाठी 200 रुपये अधिक सेवा कर भरावा लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
RBI चा मोठा निर्णय! आता 'या' बँकेच्या ग्राहकांना खात्यातून काढता येणार फक्त 1000 रुपये
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्नाटकच्या डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत (Deccan Urban Co-op Bank) एक मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने डेक्कन अर्बन बँकेला नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवी स्वीकारण्यावर बंदी घातली आहे. तसेच ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातून एक हजाराहून अधिक रक्कम काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ही सूचना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सहकारी बँकेला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय नवीन गुंतवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. आरबीआयने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना यासंबंधी सूचना दिल्या असल्याचं म्हटलं आहे. यासंबंधी केंद्रीय बँकेने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, "बँकेची सध्याची स्थिती लक्षात घेता ठेवीदारांना सर्व बचत खाती किंवा चालू खात्यांमधून एक हजार रुपयांहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी मिळणार नाही." तसेच बँकेने ग्राहकांना कर्जाबाबत देखील माहिती दिली असून त्यासाठी काही अटी असल्याचं म्हटलं आहे.