नवी दिल्ली- आठवड्याच्या शनिवारी सर्वांनाच बँकेची कामं आठवतात. कामाच्या थबडग्यातून इतर काम करायला वेळच मिळत नाही. परंतु आता तुम्हाला याच आठवड्यात बँकांची कामं उरकून घ्यावी लागणार आहेत. कारण पुढच्या आठवड्यात तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. पुढच्या आठवड्यातील शनिवारपासून बँकांना तीन दिवस सुट्टी असेल. पुढच्या आठवड्यात 12 ते 14 जानेवारीपर्यंत बँका बंद राहणार आहेत. 12 जानेवारीला दुसरा शनिवार आहे. त्यामुळे बँकांना सुट्टी राहणार आहे. 13 जानेवारीला रविवारी असल्यानं बँका बंद राहतील. तर 14 जानेवारी सोमवारी मकरसंक्रांत/पोंगल सणानिमित्त बँकांना सुट्टी देण्यात आली आहे.या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास आपल्याला पैशांची चणचण भासणार नाही. तर दुसरीकडे संपावेळी फक्त सरकारी बँक बंद राहणार आहेत. खासगी बँका या सुरूच ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे खासगी बँकांतून तुमचं खातं असल्यास तुम्हाला त्यातून व्यवहार करता येणार आहेत. तसेच कॅश काढताना डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा वापर करावा, जेणेकरून तुम्हाला बँकेत जावं लागणार नाही. तसेच पेटीएम किंवा इतर पेमेंट ऍपचाही तुम्ही वापर करू शकता.
पुढच्या आठवड्यात तीन दिवस बँका बंद, आजच उरकून घ्या महत्त्वाची कामं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 3:29 PM