मुंबई- बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली असून, शुक्रवारपासून तीन दिवस बँका बंद राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना बँकांची कामं शुक्रवारच्या आधी लवकरात लवकर उरकावी लागणार आहेत. 1 फेब्रुवारीला पहिला शनिवार असल्यानं बँका तशा खुल्या असतात. परंतु बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं संपाची हाक दिल्यामुळे बँका शनिवारीही बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस बँकांचं कामकाज चालणार नाही.
बँक कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. 'इंडियन बँक असोसिएशन'सोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात झालेली चर्चा फिस्कटल्यामुळे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (बँक कर्मचारी संघटना) दोन दिवसीय संपाची हाक दिली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरणाला बँक कमर्चाऱ्यांनी विरोध केलेला आहे. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्याच दरम्यान बँक कर्मचारी संपावर असल्याने बँका बंद राहणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण 31 जानेवारी रोजी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार असून, (शनिवारी )1 फेब्रुवारी रोजी त्या अर्थसंकल्प सादर करतील. विशेष म्हणजे मागण्या मान्य न झाल्यास मार्च महिन्यात पुन्हा एकदा संप पुकारणार असल्याचा इशारा बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
बँक कर्मचाऱ्यांनी 12.25 टक्के वेतनवाढीची मागणी केली होती. या मागणीसह कर्मचाऱ्यांसाठी विशेष भत्ते आणि कायमस्वरूपी पाच दिवसांचा आठवडा (फाईव्ह डे वीक) या मागण्या मांडल्या होत्या. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरणाला बँक कमर्चाऱ्यांचा विरोध आहे.Today there was a conciliation meeting by CLC. IBA wanted to defer the strike after which they will call for further talks.We refused. CLC advised IBA to hold talks before the strike to try to resolve issue. There was no commitment from IBA.
— All India Bank Employees' Association (@AIBEA_India) January 27, 2020
Hence go ahead with the strikes.