मुंबई : पाच वर्षांमध्ये बँकांमधील तब्बल ३0 टक्के नोक-या कमी होतील, अशी शक्यता सिटी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पंडित यांनी वर्तवली आहे. त्यामुळे बँकांत नोक-या करणा-यांचा रोजगार जाईल आणि नवे रोजगारही निर्माण होणार नाहीत. तंत्रज्ञानात वेगाने होणा-या बदलांमुळे बँकिंग क्षेत्रात इतक्या रोजगाराची गरजच भासणार नाही, असे पंडित यांनी म्हटले आहे.बँकिंगमध्ये रोबोटिक्सबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रमाण यापुढे अधिक वेगाने वाढत जाईल. आता बँकांचे भौगोलिक ठिकाण (फिजिकल प्लेस) म्हणून पूर्वीसारखे महत्त्व राहिलेलेनाही आणि तशी गरजही राहिलेली नाही. आर्थिक व्यवहारांसाठी तिथे जाण्याची पूर्वीइतकी आणि पूर्वीप्रमाणे आता गरजच नाही,याचा विक्रम पंडित यांनी या संदर्भात उल्लेख केला आहे. मोबाइल, इंटरनेटद्वारे बँकांचे व्यवहार करता येतात आणि तसे करणाºयांचे प्रमाण वाढले आहे.दुसºया बाजूला बँकांमध्येही स्वयंचलित यंत्रांचा वापर वाढला आहे. या सर्व बदलांमुळे हे बँकिंग क्षेत्रातील रोजगार कमी होणार आहेत, असे विक्रम पंडित यांचे म्हणणे आहे. हल्ली बँकांमध्ये पूर्वीसारखी गर्दी होताना दिसत नाही. आता एटीएमच्या रांगेतही उभे राहावे लागत नाही. हातातील मोबाइल वा घरातील कॉम्प्युटर, लॅपटॉप यांच्या आधारे सारे बँकिंग व्यवहार शक्य होत आहेत. बाजारहाट करतानाही खिशातील पाकिटात पूर्वीप्रमाणे पैसे नेण्याची गरज कमी-कमी होत चालली आहे. त्याऐवजी आधी अनेक कार्डांचा वापर होत असे. आता तर त्यांचीही आवश्यकता कमी होत असून, मोबाइलवरील अॅपद्वारे रकमांचे हस्तांतर होत आहे. या साºयांचा परिणामही बँकिंंग व्यवस्थेवर आणि तेथील नोकºयांवर निश्चितपणे होताना दिसत आहे.भरती जणू बंदचगेल्या काही वर्षांमध्ये बँकांमधील भरतीही एक तर कमी होत आहे वा बंदच होत चालली आहे. याचा भार असलेल्या कर्मचारी व अधिकाºयांवर पडत आहे, असे बँक कर्मचारी संघटना म्हणत आहेत.मात्र, या संभाव्य धोक्याची जाणीव त्यांनाही आहे. त्यामुळेच नवीन भरतीऐवजी असलेल्या कर्मचाºयांना अधिकाधिक आर्थिक भार मिळवून देण्यासाठी त्यांचे हल्ली प्रयत्न सुरू असतात.
बँकांमधील नोक-यांत होणार ३0 टक्के घट, विक्रम पंडित यांनी वर्तविली शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:37 AM