चेन्नई : वेतनवाढीसंदर्भातील वाटाघाटी अपूर्ण असतानाच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना १२ टक्के वाढीच्या हिशेबाने वेतनाच्या फरकाची रक्कम (थकबाकी) देण्याचा निर्णयघेतला आहे. कर्मचाºयांच्या खात्यावर पैसे जमा केले जात असल्याचेही वृत्त असून, कर्मचाºयांसाठी हा दिवाळीचा बंपर लाभ ठरणार आहे.सरकारी बँकेच्या एका कर्मचाºयाने सांगितले की, कराराआधी वाढीव वेतनाची रक्कम मिळण्याची ही बँकांच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. कर्मचाºयांना थकबाकीपोटी मिळणारी रक्कम ५0 हजार रुपयांपेक्षा कमी नसेल आणि काहींना तर १ लाख रुपयांपेक्षा अधिक मिळतील.सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी नोव्हेंबर २0१७ पासून वेतनवाढीसाठी लढत आहेत. युनायटेड फोरम फॉर बँक युनियन्स (यूएफबीयू) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) यांच्यात चर्चेच्या ३0 फेºया झाल्या आहेत. तथापि, वेतन करारावर एकमत झालेले नाही. गेल्या वेळी १५ टक्के वाढ मिळाली होती. यंदा बँक कर्मचाºयांना १२ टक्के वाढ देऊ केली आहे. कर्मचारी संघटना हा प्रस्ताव स्वीकारण्यास तयार नाहीत.१ आॅक्टोबर रोजी आयबीएनेसरकारी आणि खासगी बँकांना एक पत्र लिहून कर्मचाºयांना एक महिन्याच्या वेतनाएवढी (मूळ वेतन+महागाई भत्ता) रक्कम हंगामी स्वरूपात देण्यास सांगितले आहे. वेतन कराराच्या अंतिम रकमेतून थकबाकी नंतर वजा करून घेतलीजाईल. (वृत्तसंस्था)संघटनांचा आवाज बंदएका कर्मचाºयाने सांगितले की, करार अंतिम होण्याआधीच वेतन फरकाचे आंशिक भुगतान करून सरकारने कर्मचारी संघटनांचा आवाजच हिरावून घेतला आहे. अंतिम करार हा १२ टक्क्यांपेक्षा कमी नसेलच. त्यामुळे याच दराने फरकाची आंशिक रक्कम अदा करण्याचे व्यवस्थापनाने ठरविले आहे.
बँक कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बंपर लाभ; फरकाच्या रकमेचे मिळणार ५0 हजार ते एक लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 6:04 AM